For this reason he put the ax in the head 
पश्चिम महाराष्ट्र

या कारणासाठी त्यांनी घातली डोक्यात कुऱ्हाड, वाचा काय आहे प्रकरण

सकाळवृत्तसेवा

कवठेमहांकाळ (जि . सांगली) : तालुक्‍यातील करोली (टी) येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून कुऱ्हाडीने डोकीत मागील बाजूस मारून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.27) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दत्तात्रय कर्पे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहे.फिर्याद राजेंद्र कर्पे यांनी दिली.पोलिसात शुभम कर्पे व विशाल कोळेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की करोली (टी) येथे चुलत भाऊ दत्तात्रय कर्पे गावच्या हद्दीत धुळगाव रोडला शेळ्या राखण्यासाठी गेले होते.यावेळी शुभम कर्पे व विशाल कोळेकर यांनी मोटरसायकलवरून येऊन दत्तात्रय याला अनैतिक संबंधाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुराडीने डोक्‍यात मागील बाजूस मारून गंभीर जखमी केले.पोलिसात शुभम कर्पे व विशाल कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे करीत आहेत. 

दरम्यान शुभम कर्पे धूळगाव रोडला जनावरे घेऊन गेले असता दत्तात्रय कर्पे याने हातवारे करून शिवीगाळ केली.मागील भांडणाचा राग मनात धरून कुऱ्हाडीने डाव्या हाताच्या खांद्यावर मारून जखमी केले.आई लता कर्पे व हनुमंत देवकाते यांनाही जखमी केल्याचे शुभमने फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान पोलिसात दत्तात्रय कर्पे ,महावीर कर्पे,काकाजी कर्पे व राजेंद्र कर्पे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.तपास पोलिस नाईक आमीरशा फकीर करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat : सलग सुट्ट्यांमुळे सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट जाम होणार? एकाच लेनमधून सुरू आहे वाहतूक, 'या' वळणावर अपघाताचाही धोका!

Kalyan-Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपावरून युतीत अनिश्चिततेचे ढग; 73 जागांच्या मागणीने युतीत तणाव !

Panchang 26 December 2025: आजच्या दिवशी

वाहतूक समस्येला ‘लोकवैज्ञानिक’ पर्याय

Healthy Bengali Shukto: हलकी गोडसर चव, सुगंधी मसाले आणि पौष्टिक भाज्यांसह; हिवाळ्यासाठी तयार करा आरोग्यदायी बंगाली शुक्तो

SCROLL FOR NEXT