एसटी sakal
पश्चिम महाराष्ट्र

एसटीच्‍या खासगीकरणाला विरोधासाठी मोट बांधणार

गुरव, मगदूम; विद्रोही चळवळीतर्फे बुधवारी ‘कष्टकऱ्यांची दौलत’मध्‍ये व्यापक बैठकीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

सांगली - एसटी महामंडळाच्या खासगीकरणाविरुद्ध मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठीच बुधवारी (ता. २२) येथील कष्टकऱ्यांची दौलत इमारतीत व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे. धनाजी गुरव, विकास मगदूम यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘राबणाऱ्या बहुजन समाजाने लढून शिक्षणाचा हक्क मिळवला. स्त्रिया शिकत आहेत. महाराष्ट्रात एसटीने शिक्षण गावागावात पोहचवले. अनेक शिक्षण संस्था निघाल्या. मुली शिकायला लागल्या. बाजार, जत्रा, एमआयडीसी बसच्या माफक दर, पास, सवलत यामुळे भरभराट झाली. हा विकासाचा सर्व खर्च जनतेच्या घामातून होत आला आहे. आतापर्यंत जनतेने घडवलेली, वाढवलेली एसटी काही भांडवलदारांच्या घशात घालण्याचे डावपेच चालले आहेत. एसटीचे खाजगकरण झाले तर मुलींचे आणि ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण बंद होईल. अनेक शिक्षण संस्था बंद पडतील. सगळ्यावरच परिणाम होईल. रोजगार मिळणार नाही. बेरोजगारी वाढेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या खाजगकरणाच्या धोरणाने राबणारा बहुजन समाज नव्या गुलामगिरीत जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि मित्र संघटना मिळून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात निर्णायक आंदोलनं उभे करणार आहोत. त्याच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवारी दुपारी २ वाजता होईल. बहुजनांचे शिक्षण, रोजगार आणि विकासाबद्दल विचार करणाऱ्या सर्व चळवळीनी हजर राहावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT