पश्चिम महाराष्ट्र

... तर घरी येणार दंडाची पावती!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. 11 : वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दंडाची पावती घरपोच मिळणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून येत्या 18 नोव्हेंबरपासून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. 
रस्ता सुरक्षा समितीने 2020पर्यंत प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 50 टक्के कमी करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न वापरणे आदींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलास अत्याधुनिक साधनसामग्री असणारे वाहन अप्पर पोलिस महासंचालकांकडून देण्यात आले आहे. या विशेष वाहनामध्ये भरधाव वाहनाची वेगमर्यादा मोजण्यासाठीची यंत्रणा, ब्रिथ ऍनालायझर यासह इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. 
18 नोव्हेंबरपासून महामार्गावर अत्याधुनिक यंत्रणेसह कारवाईसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनमालकास घरपोच नोटीस पाठविली जाणार आहे. तसेच त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेशही जाणार आहे. अनेक लोक त्यांच्या वाहनाच्या काचेला डार्क ग्लास लावतात. त्या ग्लासची जाडी मोजण्याचे मशिनही या वाहनामध्ये उपलब्ध असणार आहे. अशा वाहनांना तपासणी करून जागेवरच दंडाची नोटीस देण्यात येणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
-- 
पोलिसांना उपलब्ध झालेल्या नव्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून 100 मीटर परिसरात वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाचा क्रमांक कॅप्चर केला जाणार आहे. हा क्रमांक कंट्रोल रूमकडे जाईल. तेथून संबंधित वाहनमालकास दंडाची नोटीस घरपोच पाठविली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला गती मिळणार आहे. 
- अतुल झेंडे, 
अप्पर पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT