Record of Jain Association's activities to India Book of Record
Record of Jain Association's activities to India Book of Record 
पश्चिम महाराष्ट्र

जैन संघटनेच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे नोंद

सकाळवृत्तसेवा

सांगली : मनोबलवृद्धी, आत्मविश्वास, स्वसंरक्षण, संस्कारमूल्य अशा गोष्टींवर आधारीत भारतीय जैन संघटनेच्या युवती सक्षमीकरण उपक्रमाच्या माध्यमातून पाच हजार मुलींना प्रशिक्षीत करण्यात आले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेत बुधवारी विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र व पदक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान केले. 

नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर कार्यक्रम झाला. दोन दिवसांपासून युवती सक्षमीकरण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. एकाचवेळी पाच हजार मुलींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. संघटनेच्या प्रशिक्षकांमार्फत विविध गोष्टींबाबत प्रशिक्षित करण्यात आले. स्वयंजागृती, संवाद आणि नातेसंबंध, स्वसंरक्षण, निवड व निर्णय, मैत्रभाव अशा अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवसांच्या प्रशिक्षणांनंतर युवतींचा मेळावा कल्पद्रुम क्रीडांगणावर झाला. 

शांतिलाल मुथा फाऊंडेशनचे प्रमुख शांतिलाल मुथा, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, केंद्रीय सदस्य व आयोजक सुरेश पाटील, लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टचे किशोर लुल्ला, संघटनेचे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंड पाटील, भालचंद्र पाटील, आण्णासाहेब उपाध्ये, प्रमोद पाटील, मिलिंद चौधरी, पारस ओस्वाल, महिला संघटनेच्या अध्यक्षा अर्चना मुळे उपस्थित होते. 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परिक्षक कुशल सचन यांनी कार्यक्रमात विक्रमाची नोंद झाल्याचे स्पष्ट करीत त्याठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पदक व प्रमाणपत्र प्रदान केले. अशा प्रकारचा युवती सक्षमीकरणाचा व्यापक कार्यक्रम भारतात प्रथम होत असल्याचे व अशा विक्रमाची नोंदही पुस्तकात नव्याने होत असल्याचे कुशल यांनी सांगितले. राजगोंड पाटील, सुभाष देसाई, बी. व्ही. शेट्टी, दीपक पाटील, अर्चना मुळे यांनी संयोजन केले. राज्यभरातून 50 प्रशिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT