yashomati-thakur 
पश्चिम महाराष्ट्र

खुषखबर...राज्यात लवकरच अंगणवाडी सेविकांची भरती 

तात्या लांडगे

सोलापूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीवर घातलेले निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. मागील तीन वर्षांत रिक्‍त झालेल्या सहा हजार 500 पदांच्या भरतीला महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मान्यता दिली आहे. भाडे तत्त्वावरील अंगणवाडी इमारतीच्या भाडेवाढीचाही निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्‍त जामसिंग गिरासे यांनी दिली. 


महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास विभागाच्या मंत्रिपदाची संधी मिळालेल्या ऍड. ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांचा विषय हाती घेतला आहे. गावोगावी पुरेशा प्रमाणात अंगणवाड्या सुरु व्हाव्यात, मुलांना शिक्षणाची गोडी लागावी या हेतूने नव्या 98 अंगणवाड्या तर 745 मिनी अंगणवाड्या सुरु करण्यात येणार आहेत. तर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची 45 रिक्‍त पदेही भरती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच भाड्याच्या इमारतीत सुरु झालेल्या 37 हजार 545 अंगणवाड्यांचे भाडे ग्रामीण भागात 750 रुपयांवरुन आता एक हजार तर नागरी भागातील भाडे 750 रुपयांवरुन चार हजार तर महानगरात सहा हजारांपर्यंत भाडेवाढीचाही निर्णय घेतला आहे. 

महिला व बाल विकास मंत्र्यांचे निर्णय 

  • अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या साडेसहा हजार पदभरतीला मंजुरी 
  • केंद्राने मान्यता दिलेल्या, मात्र सुरु न झालेल्या 745 मिनी अंगणवाडी केंद्रांना मान्यता 
  • एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 98 नव्या अंगणवाडी सुरु करण्यास मंजुरी 
  • भाडे तत्वावरील अंगणवाडी इमारतीच्या भाड्यात 250 ते तीन हजार 225 पर्यंत वाढ 
  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या 45 रिक्‍त पदभरतीलाही दिली मान्यता 
  •  

मानधन वाढीची लवकरच गुड न्यूज 
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनाचा विषय मागील काही वर्षांपासून प्रलंबितच आहे. तत्पूर्वी, मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी तीन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीला मान्यता दिली. आता अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचाही त्यांनी आढावा घेतला. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच गुड न्यूज मिळेल, अशी आशा लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT