पश्चिम महाराष्ट्र

विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कमाल १०० जणांना मुभा; तरीही उपस्थिती अधिक

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : लॉकडाउन (lockdown) काळात याआधी विवाह समारंभात ४० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर बेळगाव जिल्हा अनलॉक (belguam unlock) झाल्यानंतर २१ जूनपासून अन्य जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यातही विवाह समारंभास असणाऱ्या नियमात आणखी शिथिलता आणण्यात आली. त्यामुळे कमाल १०० जणांना लग्न समारंभास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाचे (covid-19) संकट बऱ्यापैकी कमी झाल्याने तसेच अधिकारीवर्गांचेही दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी साजरा होत असणाऱ्या विवाह सोहळ्यास १०० हून अधिक जणांची उपस्थिती राहत आहे. तर प्रशासनाने दिलेल्या नियमांचेही उघडपणे उल्लंघन होत आहे. काही ठिकाणी पाचशेहून अधिक जणांच्या उपस्थितीत थाटात विवाह सोहळे पार पडत आहेत. लॉकडाउन काळात विवाह सोहळ्यांच्या आयोजनाकडे प्रशासन तसेच संबधित अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष होते. तसेच नियमांचे उल्लंघन केलेल्याविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, सध्या प्रशासनाचेही काहीसे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

विवाह सोहळ्यात (marriage) कोरोनासंबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. मात्र, या नियमांचेही काटेकोरपणे पालन होताना दिसून येत नाही. लग्न समारंभात पै-पाहुणे, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांची उपस्थिती राहणारच. परंतु, कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे निवारलेले नाही. तरीही बऱ्याच ठिकाणी १०० हून अधिक जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत आहेत. मात्र, हा अतिरेक पुढील दिवसात धोकादायक ठरणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक बनले आहे.

"लग्न सोहळ्यात केवळ १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे असे प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल."

- डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT