reharsal's today for corona vaccination in Sangli district today 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना लसीकरणासाठी सांगली जिल्ह्यात आज रंगीत तालीम

अजित झळके

सांगली ः कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीकरणाची रंगीत तालीम उद्या (ता. 8) सकाळी नऊ वाजता जिल्ह्यात तीन ठिकाणी केली जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार त्याचे नियोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालय, कवलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सांगली शहरातील हनुमाननगर येथील मनपाच्या रुग्णालयात ही तालीम होईल. 25 रुग्णांना लसीकरण दिल्याची तालीम करून त्यासाठीची सज्जता सिद्ध केली जाईल.

कोरोनाच्या महामारीशी संघर्षात लसीकरणाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लसीकरण प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच लस दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला लस दिली जाणार आहे.

सुमारे 30 हजार जणांची त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यात डॉक्‍टर, परिचारिका, मेडिकल चालक, रुग्ण वाहिका चालक, अन्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांचा समावेश आहे. त्यांची ऑनलाईन नावनोंदणी करण्यात आली आहे. 

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे म्हणाले,""यातील 25 लोकांना प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण दिल्याची रंगीत तालीम शुक्रवारी होईल. लाभार्थीना एक एसएमएस पाठवले जाईल. तो त्याला पोहोचला का, हे पाहिले जाईल. रुग्ण तेथे आल्यानंतर त्याचे समुपदेशन केले जाईल. त्याचे आधार कार्ड पाहून तपासणी होईल. त्यानुसार त्यांना एसएमएसद्वारे एक नोंदणी क्रमांक मिळेल. त्यानुसार लस दिली जाईल. अर्धा तास देखरेखीखाली ठेवले जाईल.

काही त्रास होत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घरी पाठवले जाईल. प्रत्यक्षात कुणालाही थेट लस दिली जाणार नाही. ही फक्त रंगीत तालीम आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीकरण होईल, याची माहिती आमच्या यंत्रणेला होईल.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT