Satara merchants protest against one way traffic 
पश्चिम महाराष्ट्र

"एकेरी वाहतूक हटवा, अन्‌ व्यवसाय वाचवा' ; व्यापाऱ्यांची निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः पोलिस मुख्यालयापासून शनिवार चौकापर्यंत जाण्यासाठी केलेली एकेरी वाहतूक रद्द करा अन्यथा सोमवारी (ता. 21) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा कर्मवीर पथावरील व्यापाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आज व्यापाऱ्यांनी कर्मवीर पथावर "एकेरी वाहतूक हटवा, आमचे व्यवसाय वाचवा' अशा आशयाचे फलक हातात घेऊन निदर्शने केली.

 
पोलिसांनी पोलिस मुख्यालयापासून ते शनिवार चौकापर्यंत एकेरी वाहतूक लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेले तीन महिने आम्ही जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि पोलिस अधीक्षकांकडे आमचे गाऱ्हाणे मांडत आहोत. त्यानंतर बैठकाही झाल्या. या प्रश्‍नी समिती तयार करण्यात आली आणि त्यानंतर सर्व्हे झाला. प्रशासनाने तब्बल तीन महिने वेळकाढूपणा केला.

एकेरी वाहतुकीमुळे आमच्याकडे ग्राहक वर्ग येत नाही. परिणामी आर्थिक मंदीमुळे व्यापारही खालवला आहे मात्र, येथील गाळेधारकांना तीस- तीस हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. एकूणच आमचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. अशी पार्श्‍वभूमी असताना आमच्या मागण्यांचा विचार होत नसल्याने सोमवारी (ता. 21) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar: अंत पाहू नका, अण्णा हजारेंचा सरकारला इशारा; वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत व्यक्त केली चिंता

'अर्जुन बिजलानी मौनी रॉयला डेट करतोय?' उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'नात्यात प्रेमसंबंध...'

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवर शरद पवारांचा सरकारला इशारा; मुदतीत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ayodhya Ram Temple: राम मंदिर दानचोरीचे प्रायश्चित्त, अयोध्येत दररोज २५१ वेळा विष्णू सहस्रनाम पठण; क्षमा मागण्यासाठी विधीचे आयोजन

NEET Success Story : रिक्षा चालक वडिलांसोबत पत्नीची मदत, विशालने NEET मध्ये मिळवले ६०५ गुण; डॉक्टर होऊन वडिलांना कार घेण्याचे स्वप्न, कर्ज काढून शिकवल्याचे चिज

SCROLL FOR NEXT