report of the woman from Turmuri was positive 
पश्चिम महाराष्ट्र

तुरमुरीतील  'त्या' महिलेचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

बेळगाव ः मुंबईहून माहेरी आलेल्या तुरमुरीतील पस्तीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. मुंबईहून परतल्यानंतर त्या महिलेला 14 दिवस गावातील शाळेतच 9 जणांसोबत क्वारंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. 29) क्वारंटाईनमधील सर्वांना घरी सोडण्यात आले होते, मात्र आज यामधील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

या महिलेला तिच्या लहान मुली आणि पतीसह घरी पाठविण्यात आले होते. मात्र, सायंकाळीच या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज (ता. 30) सकाळी गावात पोलिस आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी दाखल झाले. तसेच या महिलेला रुग्णवाहिकेमधून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपासून ती आपल्या कुटुंबीयांसमवेत राहिल्याने तिच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या पती, मुलगीसह चौघांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे आता स्वॅब घेतले जाणार असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. 

मुंबईहून परतल्यानंतर संबंधीत महिलेसह महिलेचा पती, मुलगी व परराज्यातून आलेल्या गावातील इतर सहा जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रत्येकाला स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वांचा पहिला अहवाल निनेगेटिव्ह आला होता. काल चौदा दिवस पूर्ण झाल्याने सर्वांना घरी पाठविण्यात आले होते. शाळेतील स्वतंत्र खोलीत प्रत्येकाची व्यवस्था करण्यात आल्याने क्वारंटाईनमधून घरी जाऊ देण्यात आलेल्यांची पुन्हा तपासणी करण्यात आलेली नाही. मात्र ती घरी परतल्यानंतर घरातील नातेवाईकांच्या संपर्कात ही महिला आली असल्याने आता पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. 

अन्य चार जणांनादेखील क्वारंटाईन
मुंबईहून आलेल्या तुरमुरीतील महिलेचा अहवाल पॉझिटि आला आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य चार जणांनादेखील क्वारंटाईन केले असून त्यांच्या स्वॅबचीही तपासणी केली जाणार आहे. 
-डॉ. संजय डुमगोळ, तालुका आरोग्याधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT