train  sakal
पश्चिम महाराष्ट्र

आरक्षित तिकीटांतून सुटका; प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

मुंबईतील लोकल सेवा राज्य शासनाच्या परवानगीने काही आटींच्या अधिन राहून सुरू करण्यात आली.

शंकर भोसले

मुंबईतील लोकल सेवा राज्य शासनाच्या परवानगीने काही आटींच्या अधिन राहून सुरू करण्यात आली.

मिरज : नोकरीनिमित्त नियमित रेल्वेने प्रवास करणा-यांची आता रोज आरक्षित तिकीट काढण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. मध्य रेल्वेकडून लवकरच रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांना पास मिळणार आहे. वैद्यकीय उपचारामुळे लस न घेतलेल्या प्रवाशांनादेखील पास दिला जाणार आहे. पण वैद्यकीय उपचाराचे पुरावे रेल्वे प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहेत. १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लस न घेतल्यामुळे पास मिळणार नाही. राज्यशासनाकडून सध्या काही जाचक अटींवर राज्यातील पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. मुंबईतील लोकल सेवा राज्य शासनाच्या परवानगीने काही आटींच्या अधिन राहून सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात पॅसेंजर सुरू करण्याच्या दृष्‍टीकोनातून राज्य प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणजे पास धारकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लशीचे दोन डोस घेतले असणे सक्तीचे करण्यात आले आहेत. लस घेतल्यानंतर चौदा दिवसांच्या कालावधीनंतरच पास मिळणार आहे.

"राज्यसरकारच्या आदेशान्वये लशीचे दोन डोस घेतलेल्या जुन्या प्रवाशांना आणि नव्याने लस घेतलेल्या तसेच चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या प्रवाशांना पास देण्याची प्रक्रिया पुणे स्थानकात सुरू आहे. लोकल, एक्स्प्रेसने प्रवास करणा-या प्रवाशांना नक्कीच लाभ होणार आहे."

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे

"पुणे रेल्वे विभागास राज्य शासनाकडून प्राप्त परिपत्रकावरून लवकरच पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या परिपत्रकात लस घेतली असणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत."

- किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी सेना, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT