Restrictions on Urusa of Khwaja Mirasaheb Dargah of Mirza 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेच्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसावर निर्बंध 

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील प्रसिध्द ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसासह त्यानिमीत्त आयोजीत केल्या जाणा-या संगीतसेवेवरही यंदा निर्बंध येणार आहेत. सोमवारी (ता. 1) प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी माहिती देण्यासाठी बैठक आयोजीत केली आहे. 700 वर्षांपूर्वीपासून दरवर्षी आयोजीत केल्या जाणा-या उरूसावर यंदा निर्बंध येणार आहेत. नऊ मार्चपासुन सुरू होणारा यंदाचा उरूस 646 वा आहे. यंदाही केवळ धार्मिक कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. ऊरूसानिमीत्त उभारले जाणारे पाळणे, खेळण्यांच्या दुकानांवरही बंदी असेल. ऊरूस कालावधीत होणारी संगीतसेवाही बंदी आदेशामुळे यावर्षी होणार नाही. 

दरवर्षाप्रमाणे यंदाचा ऊरूस नऊ मार्चपासून आहे. देशभरातुन भक्त येतात. हिंदु- मुस्लीम ऐक्‍याचे प्रतिक समजल्या जाणा-या उरूसानिमीत्त शहरात दहा दिवस उत्साही वातावरण असते. लाखो भाविक, हजारो व्यावसायिक येतात. कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भक्त मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या राहण्या-जेवणाचीही सोय दर्गा विश्वस्तांकडून केली जाते. दर्ग्यास नेत्रदिपक रोषणाई केली जाते. ऊरूसाचा प्रारंभ 28 फेब्रुवारी रोजी मंडप उभारणीने होणार आहे. 8 मार्च रोजी गंधरात्र विधी होईल. नऊ मार्च रोजी उरूसाचा मुख्य दिवस आहे. पहिला मानाचा गलेफ चर्मकार समाजाकडून अर्पण केला जातो. त्यानंतर मानक-यांचे गलेफ अर्पण केले जातात. दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता गंधलेपचा मुख्य विधी आहे. 

हे सगळे विधी कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करुन होतील. त्याचवेळी शास्त्रीय संगीतात्ती किराना घराण्याचे अध्वर्यु अब्दुल करीम खॉं यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत संगीत सेवा संगीतप्रेमींसाठी पर्वणी असते. त्यात सहभागासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज कलाकार येतात. संगीतसेवेचा प्रारंभ किराना घराण्यातील जेष्ठ गायक, वादकाच्या अदाकारीने होतो. त्यानंतर तीन दिवस कलाकार गायन, वादनाची कला सादर करतात. यंदाच्या संगीतसभेचे आयोजन 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान केले होते. मात्र सलग दुस-या वर्षी कोरोनामुळे रसिकांना या पर्वणीला मुकावे लागणार आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातून ड्रग्स जोपर्यंत हद्द हद्दपार होणार

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

SCROLL FOR NEXT