corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाऊन शिथिलतेचा परिणाम या जिल्ह्यात येणाऱ्यांच्या संख्या घटतेय 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात 47 हजार 640 व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत. बाहेर जाणाऱ्यांची संख्या मात्र एक लाख सात हजार 281 एवढी आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटत असल्याचे स्पष्ट होत आहे. लॉकडाऊन शिथिलमुळे ही संख्या घटत असुन आगामी काळात आणखी शिथिलता मिळाली तर हे प्रमाण आणखी घटण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार 27 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 281 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेल्या आहेत तर सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 47 हजार 640 व्यक्ती आल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 34 हजार 619 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 72 हजार 662 व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 11 हजार 235 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 36 हजार 405 व्यक्तींचा समावेश आहे. 

  • जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटूतेय... 
  • तारीख, व्यक्ती 
  • 25 मे, 1602 
  • 26 मे, 1096 
  • 27 मे 1325 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

IPL 2026, RR vs CSK: धोनीशिवाय चेन्नई मैदानात, संजू सॅमसनचं पदार्पण, तर जडेजाची राजस्थानसाठी घरवापसी; पाहा प्लेइंग इलेव्हन

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांसाठी जिल्ह्यात मोठी फिल्डींग! सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे इच्छुकांचे लॉबिंग

SCROLL FOR NEXT