Sangli muncipal corporation
Sangli muncipal corporation Sakal
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या पाच फुटीर नगरसेवकांच्या अपात्रता प्रस्तावावर मंगळवारी निकाल

सकाळ वृत्तसेवा

सांगली - महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षीय आदेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेणाऱ्या भाजपच्या पाच सदस्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. येत्या मंगळवारी (ता. २४) त्यांच्या सदस्यत्वाचा फैसला होणार आहे. यामुळे फुटीर सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरसेवक पद टिकविण्यासाठी त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज विभागीय आयुक्तांसमोर याबाबत सुनावणी पार पडली.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या अपर्णा कदम, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीम नाईक या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना थेट मतदान केले होते; तर शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने हे दोन सदस्य गैरहजर होते. विशेष म्हणजे मतदान प्रक्रियेच्या आधी भाजपने त्यांच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना पक्षीय आदेश बजावला होता. तरीही संबंधित नगरसेवकांनी पक्षाचा आदेश डावलला होता. या सहा सदस्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, असा प्रस्ताव भाजप गटनेते विनायक सिंहासने यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दाखल केला आहे. यापैकी आनंदा देवमाने यांना भाजपने ‘क्लिन चीट’ दिली आहे. त्यांना या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे.

आज विभागीय आयुक्तांच्या समोर सुनावणीवेळी फुटीर पाच सदस्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी म्हणणे मांडले. याशिवाय या प्रकरणातून निवडणूक निर्णय अधिकारी व नगरसचिव यांना वगळण्याची मागणी केली. तसेच निवडणूक प्रक्रियेची चित्रीकरण करण्यात आलेली सीडी देण्याची मागणी केली. याला भाजप गटनेते विनायक सिंहासने यांचे वकील प्रमोद भोकरे यांनी हरकत घेतली. फुटीर सदस्यांचा हा वेळकाढूपणा असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. अखेर येत्या मंगळवार २४ रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. यावेळी अंतिम निर्णय देण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापौरांची उपस्थिती

मंगळवारच्या (ता. १७) सुनावणीस भाजपच्या फुटीर सदस्यांसोबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते. येत्या २४ मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT