Retired Teacher Lost 23 Lakhs In Online Fraud 
पश्चिम महाराष्ट्र

फोन आला, तुमचे खाते बँक बंद झाले आहे, अन्...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बॅंक खाते हॅक करून ठकसेनाने निवृत्त शिक्षकाला २३ लाख ४८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सायबर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. याबाबतची फिर्याद शिवगोंडा भीमगोंडा पाटील (रा. उजळाईवाडी, करवीर) यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी

 निवृत्त शिक्षक शिवगोंडा पाटील उजळाईवाडी येथे राहतात. त्यांचे एका राष्ट्रीय बॅंकेत खाते आहे. भामट्याने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्याने आपण संबंधित बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे बॅंक खाते बंद (डिॲक्‍टिव्हेट) झाले आहे. ते सुरू करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठवतो’ असे सांगितले. त्यानुसार त्यांच्या मोबाईलवर त्याने लिंक पाठवली. या लिंकवर त्यांनी क्‍लिक केली. तशी त्यात नावासह बॅंक खात्याबाबतची सर्व गोपनीय माहिती भरा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पाटील यांनी ती माहिती भरण्यास सुरवात केली. ठकसेन ती माहिती ऑनलाईन पाहात होता. त्याआधारे पाटील यांचे त्याने बॅंक खाते हॅक केले. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांना विचारून घेतला. त्याधारे भामट्याने ७ ते ९ डिसेंबर अखेर पाटील यांच्या बॅंक खात्यातून तब्बल २३ लाख ४८ हजारांची रोकड ऑनलाईन काढून घेतली.

मोबाईल क्रमांकावरून ठकसेनाचा शोध सुरू

हा प्रकार पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी बॅंकेशी संपर्क साधून थेट पोलिस मुख्यालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेऊन संबंधित मोबाईल क्रमांकाद्वारे ठकसेनाचा शोध सुरू केला. याबाबत तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे आणि सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई करीत आहेत.

फसव्या कॉलपासून सावध राहा

आपले कार्ड ब्लॉक झाले आहे. बॅंक खात्याची तपासणी सुरू आहे, डेबिट कार्ड क्रमांक, पिन कोड, ओटीपीची मागणी मोबाईलवरून करणाऱ्यांविरोधात नागरिकांनी वेळीच तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजार सपाट पातळीवर! कोणते शेअर्स घसरले?

Satej Patil Politics : सतेज पाटलांनी डाव टाकला! कोल्हापूर महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देणार

आजचा अर्थसंकल्प ठरणार ऐतिहासिक! Budget 2026 मुळे निर्मला सीतारमण का ठरणार रेकॉर्डब्रेकिंग अर्थमंत्री? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Union Budget 2026 Live : राष्ट्रपती भवनात अर्थसंकल्पापूर्वी पारंपरिक क्षण

Bombay High Court : दत्तक मुलाला पालकाची जात लावण्याचा अधिकार, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT