Rilif to people of Nigdi: All reports are negative 
पश्चिम महाराष्ट्र

निगडी वासियांना दिलासा : सर्व अहवाल निगेटिव्ह

सकाळवृत्तसेवा

शिराळा : निगडी (ता. शिराळा, जि सांगली ) येथे दोन कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व शिराळा येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात असलेल्या त्या 14 व इतर दोन अशा 16 जणांचे कोरोना तपासणी अहवाल दुसऱ्या वेळी निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत दुसऱ्या वेळी पाठविलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने निगडी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

निगडी येथे मुंबईहून आलेल्या युवतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेली कुटुंबातील महिलाही कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 38 जणांना शिराळा येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या गावातील 101 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. आतापर्यंत क्वारंटाईन असलेल्या लोकांची संख्या 144 झाली आहे.

शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात 24, तर सद्‌गुरू आश्रमशाळा येथे 14 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे दुसऱ्यांदा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 24 जणांचे अहवाल काल (ता. 6), तर 14 जणांचे व इतर दोघांचे असे 16 जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे निगडी कोरोनातून सावरू लागली आहे. 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी उद्या (ता. 8), तर 24 जणांचा 14 दिवसांचा कालावधी शनिवारी (ता. 9) संपत आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. 

दरम्यान, मिरज येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या पाच जणांचा 14 दिवसांचा कालावधी संपल्याने त्यांना निगडी येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जाऊन तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी भेट दिली. त्या लोकांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, तुम्हाला लागणाऱ्या अत्यावश्‍यक सेवा घरी पुरविल्या जातील अशा सूचना त्यांनी दिल्या. 

आरोग्य विभागामार्फत निगडी येथे मागील 13 दिवस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12 पथके काम करीत आहेत. दैनंदिन सर्वेक्षणात 366 कुटुंबांतील एक हजार 584 लोकांची तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. डी. राजमाने, डॉ. एस. बी. पवार यांच्यासह आरोग्य सहायक डी. बी. चौगुले, आशा गटप्रर्वतक एस. एस. कुंभार, आरोग्य सहायिका एम. एम. खेडकर, व्ही. एस. डवरी, एकनाथ झाडे, छगन मंडले, राजाराम बागल, पृथ्वी शेवाळे हे कर्मचारी आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT