Risk to villagers while on-off the street light 
पश्चिम महाराष्ट्र

पथदिवे बंद-सुरू करताना ग्रामस्थांना धोका... काय झाले?

सकाळवृत्तसेवा

विसापूर : येथे गावाचा विजपुरवठा सुरू करण्यासाठी फ्युजचा वापर सुरू आहे. बटन नसल्यामुळे वीज पुरवठा बंद सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. ग्रामस्थच वीज पुरवठा बंद सुरू करीत आहेत. ग्रामपंचायतीला वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष आहे.

येथे सार्वजनिक वीजपुरवठा व स्ट्रीटलाईटसाठी ग्रामपंचायतसमोर पेटी आहे. तेथूनच गावातील सर्व खांबावरचा वीजपुरवठा सुरू आणि बंद करण्याचे नियोजन केले आहे. या पेटीची अवस्था अत्यंत धोकादायक आहे. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी बटन नाही. त्यामुळे फ्युज काढायची आणि घालायची असाच प्रकार सहा महिने सुरू आहे.

ही पेटी जमिनीपासून तीन फुटांवर आहे. पेटीला कुलुप नाही. चुकून लहान मुलांचा हात पेटीला लागून धक्का बसू शकतो. हे धोकादायक चित्र भर चौकात सर्वजण रोज पाहतात. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक पेटीकडे पाहतच जातात. मात्र, जिवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरूच आहे. 

वीज सुरू करणे अथवा बंद करण्याचे काम कर्मचाऱ्यांचे आहे. मात्र बटन असेल तरच आम्ही हात लावू असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवस उजाडला तरी दिवे सुरूच असतात. वास्तविक फ्युज घालणे आणि काढणे हा प्रकार जिवावर बेतू शकतो. असे असूनही ग्रामस्थच धोका पत्करून वीज सुरु व बंद करण्याचे काम करतात.

अशीच स्थिती बेघर वसाहतीजवळ स्ट्रीट लाईटची आहे. अण्णासाहेबांना दोन-तीन वेळा ग्रामस्थांनी कल्पना दिली. मात्र फुटकळ खर्च करून एखाद बटन बसवण्याची तसदी ना अण्णासाहेब घेतात ना सरपंच. ग्रामस्थांपैकी कोणाला धोका होण्याची वाट पाहिली जात आहे का ? असवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT