पश्चिम महाराष्ट्र

उरमोडीच्या पाण्याने माण नदी लागली वाहू ; गोंदवलेकरांमधून समाधान 

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले : उरमोडीच्या पाण्याने नऊ महिन्यांनंतर पुन्हा माण नदी वाहू लागली आहे. त्यामुळे आता दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होणार असल्याने गोंदवलेकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. या पाण्याने परिसरातील नदीवरील सर्व बंधारे भरण्यासाठी मात्र, आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
गोंदवले बुद्रुकमध्ये यंदा अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी लोकांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली असली, तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने उरमोडी पाणी योजना कार्यान्वित केली आहे. सध्या या योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माण तालुक्‍यातील किरकसाल बोगद्यापासून गोंदवले बुद्रुक येथील समाधी मंदिरातील बंधाऱ्यांमध्ये पाणी पोचले होते. हे बंधारे भरल्यानंतर आता उरमोडीचे पाणी माणगंगेत पोचले आहे. मोदळ ओढ्यातून वाहिलेल्या पाण्याने माण नदीतील बंधारा भरून वाहू लागला आहे. त्यामुळे आता माण नदी वाहू लागली आहे. 
दुष्काळी स्थितीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या डिसेंबरमध्ये उरमोडीचे पाणी मंदिर परिसरातील बंधारे भरून पहिल्यांदा माणगंगेत आले होते. त्यानंतर नऊ महिन्यांनंतर दुसऱ्यांदा माण नदी या पाण्याने वाहू लागली आहे. 
गोंदवले बुद्रुक हद्दीत माण नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यांपैकी एक बंधारा पाण्याने भरला आहे. मात्र, अजून चार बंधारे भरणे आवश्‍यक आहे. त्यामुळे माण नदी सध्या वाहत असली, तरी पाणीटंचाई कमी होण्यासाठी हे बंधारेही भरण्याची आवश्‍यकता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

SCROLL FOR NEXT