The road around the hospital is paved, full of potholes 
पश्चिम महाराष्ट्र

रुग्णालयांभोवती रस्ता उखडलेला, खड्ड्यांनी भरलेला

अजित झळके

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि त्या परिसरातील सर्वच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आयुष्याशी खेळ सुरु आहे. हा भाग म्हणजे जीवनवाहिनी, मात्र तीच मृत्यूशय्येवर असल्याचा अनुभव रोज येतोय. या भागाला जोडणारा प्रत्येक रस्ता उखडलेला आहे, खड्ड्यांनी भरलेला आहे. रुग्णालयांच्या चारही बाजूंनी उघड्या गटारी आहेत आणि त्यातील अनेक तुंबलेल्या आहेत. किमान हा परिसर तरी विशेष बाब म्हणून नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे असताना महापालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. 

वसंतदादा शासकीय रुग्णालयांना जोडणारा राम मंदीर चौकापासूनचा रस्ता आता शोधावा लागतो, इतके खड्डे त्यात पडलेले आहेत. रुंदीला चार फूट, उंचीला आठ ते दहा इंचाचे खड्डे आहेत. रुग्णवाहिका आदळली तर रुग्णाचे काय होईल, याचा विचारच न केलेला बरा. या खड्यांच्या दुरुस्तीसाठी आता एखादा बळी जावा, असे प्रशासनाला वाटते की काय? हीच अवस्था शंभर फुटी रस्त्याने सिव्हिलकडे येताना आहे. या रस्त्यावर किमान दोन डझन मोठे दवाखाने आहेत. 

या रस्त्यावरून रुग्णांची वाहतूक सर्वाधिक आहे. यावर कडी म्हणजे वसंतदादा रुग्णालयाच्या आतील परिसराचीही वाट लागली आहे. तेथे फोफाटा उठू लागला आहे. नवीन इमारती बांधण्यासाठी धडपड करण्याआधी रस्त्यांची दुर्दशा थांबवावी, अशी मागणी आहे. या रुग्णालयांभोवती असलेल्या सगळ्याच गटारी उघड्या आहेत. मराठा सेवा संघ भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटार तुंबली आहे. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे. तेथून पुढे शंभर फुटी रस्त्याला जोडणारी प्रत्येक गटार उघडी आहे. या गटारीच्या काठालाच अर्धा डझन दवाखाने आहेत. तिथल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. शहरात आधीच चिकनगुणियाची साथ आहे. त्यात अशा पद्धतीने हलगर्जीपणा रुग्णांसाठी घातक आहे. 

ही आहेत दुखणी 
* खाद्य पदार्थांच्या गाड्यांचा पाणी रस्त्यावर 
* सिव्हिलच्या आतील रस्त्याची अवस्था बिकट 
* रुग्णालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुर्दशा 
* मराठा सेवा संघ भवन रस्त्यावर गटार तुंबली 
* या गटारींच्या काठालाच खाद्य पदार्थांच्या गाड्या


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT