kop
kop 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात 60 तोळे दागिन्यांसह 22 लाखांचा ऐवज लंपास 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : गुजरी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्स व जोतिबा रस्त्यावरील कोल्हेकर (देसाई) ज्वेलर्स ही दोन सराफ दुकाने चोरट्यांनी फोडली. त्यातील सुमारे साठ तोळे सोन्याचे दागिने व दहा किलो चांदीचे दागिने असा सुमारे 22 लाखांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. लुटारू सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. 

गजबजलेल्या परिसरात पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडुन जागी झाली. गुजरी ते गंगावेश रोडवर संतोष दिनकर शेळके (रा. फुलेवाडी) यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाचे कडी कोयंडा चोरट्यांनी उचकटुन आत प्रवेश केला. अवघ्या पंधरा मिनिटांत दुकानातील ड्रॉवर उचकटुन सुमारे 70 ते 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने व 66 हजारांची रोकड लंपास केली. 

जोतिबा रोडवर असलेल्या प्रमोद कल्लाप्पा कोलेकर (देसाई) यांचे सराफ दुकान आहे. या दुकानात पहाटे साडे चारच्या सुमारास तीन चोरटे मोटारीतून आले. त्यांनी शटरच्या पट्ट्या उचकटून आत प्रवेश केल्या. सुमारे पन्नास तोळे सोन्याचे दागिने आणि चार ते पाच किलो चांदीचे दागिने लंपास केले. याच दुकानातील सात ते आठ तोळे दागिने असलेली तिजोरीही पळवून नेली. सायरन वाजत असतानाही त्यांनी हे कृत्य केले. सकाळी दहाच्या सुमारास हे दोन्ही प्रकार उघडकीस आले. घटनास्थळी शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जुना राजवाड्यातील पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, शाहुपुरीचे संजय मोरे, राजरामपुरीचे संभाजी म्हेत्रे, लक्ष्मीपुरीचे वसंत बाबर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस दाखल झाले असून लुटारूंचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT