पश्चिम महाराष्ट्र

गडहिंग्लज तालुक्यात निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर दरोडा

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज - बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे एका निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी दहा लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख साडेपाच लाख असा एकूण १६ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. 

काल (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, गावातीलच आणखी दोन घरांसह शेजारच्या येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथेही घरफोडीचे प्रकार घडले. त्याने पूर्वभागात खळबळ उडाली आहे.

बसर्गे येथील निवृत्त पोलिस निरीक्षक डी. एस. जोडगुद्री, निवृत्त उपनिरीक्षक श्रीकांत नाईक व अरुण दादू कागिनकर यांची घरे बसर्गे-येणेचवंडी रोडवरील नवीन वसाहतीत आहेत. जोडगुद्री मुंबई, तर नाईक गोवा पोलिस दलात कार्यरत होते. आता पोलिस अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी झाल्याने तपासाचे आव्हान पोलिस कसे पेलणार, याकडे लक्ष आहे. 

श्री. जोडगुद्री निवृत्त झाल्यानंतर परिवारासह गावाकडे आले आहेत. ते २ सप्टेंबरला कामानिमित्त घराला कुलूप लावून परिवारासह मुंबईला गेले होते. श्री. नाईक व श्री. कागीनकर हेही घर बंद करून काही महिन्यांपासून मुंबईला गेले आहेत. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शेजारच्या व्यक्तीला जोडगुद्री यांच्या घराचा दरवाजा उघडला असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहताच लोखंडी कटावणीने कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. यामुळे जोडगुद्री यांना या घटनेची कल्पना देण्यात आली.

दरम्यान, जोडगुद्री दुपारी बसर्गेत पोहचल्यानंतर घरातील कपाटात असलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. सोन्याच्या दागिन्यांमध्ये दोन मंगळसूत्र, मोहनमाळ, श्रीमंत हार, पाटल्या, तोडे, कुडी, सोन्याचे कडे, सोन्याची चेन, सोन्याचे कॉईन, बिस्किटे, बांगड्या, ठुशी, अंगठ्या आदी, तर चांदीमध्ये पैंजण, लिंग, कॉईन असा १० लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. याशिवाय, पाच लाख ६५ हजार रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी पळविली. 
यासंदर्भात श्री. जोडगुद्री यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत श्री. नाईक व श्री. कागीनकर यांच्या घरातही चोरी झाल्याची नोंद केली आहे. परंतु, ही दोन्ही कुटुंबे मुंबईत असल्याने त्यांच्या घरातील चोरीचा तपशील समजलेला नाही. दरम्यान, बसर्गेच्या शेजारीच असलेल्या येणेचवंडी गावातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तेथील दोन घरांत चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजते. परंतु, त्याची नोंद पोलिसांत झालेली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT