पश्चिम महाराष्ट्र

मोपेडची डिक्की फोडून पाच तोळ्यांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मोपेडची डिक्की फोडून चोरट्याने त्यातील खरेदी केलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे नवीन दागिने हातोहात लंपास केले. गजबजलेल्या व्हिनस कॉर्नर येथील एका दागिन्यांच्या शोरूमच्या दारात भरदिवसा हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. याबाबतची फिर्याद सुनील बाळू डोंगळे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः डोंगळे (वय ३५) सुर्वेनगर येथे राहतात. ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते सोमवारी (ता. ७) सायंकाळी कुटुंबासोबत मोपेडवरून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी दसरा चौक परिसरातील एका शोरूमधून चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक तोळ्याचे गोल पॅडेल, असे पाच तोळ्यांचे दागिने खरेदी केले. हे दागिने त्यांनी मोपेडच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर दुसरे दागिने खरेदीसाठी ते व्हिनस कॉर्नर येथे गेले.

येथील एका शोरूमच्या दारात त्यांनी सव्वासहाच्या सुमारास मोपेड उभी केली. त्यानंतर ते शोरूमध्ये दागिने खरेदीसाठी गेले. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या गाडीची डिक्की फोडून त्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानातून बाहेर आल्यानंतर त्यांना मोपेडची डिक्की उघडी दिसली. त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. तशी त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार पोलिस ठाण्यात दोन लाख १३ हजार ६४० रुपयांच्या चोरीची नोंद झाली. अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर सुरक्षारक्षक असतानाही चोरट्याने डिक्की फोडून सोन्याचे दागिने लंपास करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 

सीसीटीव्हीत संशयित चोरटा कैद
शोरूमच्या दारात उभ्या केलेल्या मोपेडच्या अवतीभोवती एक जण संशयितरीत्या घुटमळत असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार त्याचा शोध घेण्याचे पोलिसांनी सुरू केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: भारताचे पाऊल पडते मागे... यशस्वी जैस्वालचा सहाव्या चेंडूवर कार्यक्रम, देवदत्त पडिक्कलही परतला; संकट ओढावले Video

Farande Baba Death Pattan Kodoli Yatra : पट्टणकोडोली यात्रेचे मानकरी फरांडे बाबा यांचे निधन, १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ७४ वर्षांची भाकणुकीची परंपरा

IND vs NZ 2nd Test Live: भारतीय खेळाडूंची झेल सोडण्याची स्पर्धा, गुरनूर ब्रार अन् टॉम ब्लंडल यांच्यात राडा; आकाश दीपच्या ५ विकेट्स, दुसऱ्या दिवशी बरंच काही घडलं... Video

Chura Matar Recipe: ताजे वाटाणे आले की नक्की करा ‘चुरा मटर’; चवीला भन्नाट, झटपट होतो तयार!

आजचे राशिभविष्य - 28 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT