PHOTO-2020-07-05-22-45-45.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रॉबीन हुड आर्मीचे "मिशन-30 एम' ; जिल्ह्यातील सात हजार गरजूंना मदतीचा संकल्प 

सकाळवृत्तसेवा

मिरज (सांगली) : जगभरातील अन्नाचा अपव्यय रोखण्यासाठी ऑगस्ट 2014 मध्ये स्थापन झालेल्या रॉबिन हूड आर्मी या स्वयसेवक आधारित स्वयंसेवी संस्थेने जगभरात थैमान माजवलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे जगण्याचे मूळ साधना हरवलेल्या आणि उपासमारीचा सामना करावा लागत असलेल्या लोकांना अन्न देण्यासाठी "मिशन- 30, दशलक्षांच्या जेवणाची व्यवस्था' हा उपक्रम जगभरात राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात हजारावर गरजूंना मदत देणेचा संकल्प केला असल्याची माहिती स्वयंसेवक ऋषिकेश शिरोटे, ओंकार शेगुणशी, तेजस कोकिटकर, अर्जुन भिसे, अंजली तुंगे यांनी दिली. 

श्री. शिरोटे ते म्हणाले की, सदर उपक्रम 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2020 या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू लोकांसाठी होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत गरजूंना आटा, तांदूळ डाळ, साखर आदी साहित्याचे किट करून त्याचे वाटप करण्यात येईल. सध्या आमचे स्वयंसेवक जिल्हाभर अशा गरजू लोकांचा सर्वे करीत आहे.

त्याचबरोबरीने समाजातील दानशूर लोकांकडून केवळ धान्य आणि वस्तू रूपातच मदत संकलित करण्याचे कामही सुरू झाले आहे.या उपक्रमासाठी कोणाकडूनही रोख अथवा तत्सम मार्गाने आर्थिक मदत स्वीकारली जात नाही. सदरचे किट ग्रामीण भागातील गरजू, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बेघर लोक, आजारी रुग्ण आणि दररोजच्या मजुरांना देण्याचे नियोजित असल्याचे श्री. शिरोटे यांनी सांगितले.

रॉबिन हूड अर्मीने गेल्या वर्षीच्या महापुराच्या काळात मोठे भरीव काम केले होते. पुरबाधितांच्या जेवणाची आणि आरोग्याची देखील व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली होती. लॉक डाऊन च्या काळात मिरजेतून रेल्वेने परराज्यात गेलेल्या कामगारांच्या जेवणाची सोय देखील या स्वयंसेवकांनी केलेली होती.आर्मीच्या "मिशन 30 एम' या महत्त्वकांक्षी उपक्रमासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी मदत करण्याचे आवाहन रॉबिन हूड आर्मीच्या सांगली शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT