पश्चिम महाराष्ट्र

भारीच... शस्त्रक्रियेसाठी रोबोटची मागणी !

तात्या लांडगे

सोलापूर : नागपूर येथील सर्वोपचार रुग्णालयानंतर आता सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने सुलभ व दर्जेदार शस्त्रक्रियेसाठी रोबोट मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी 25 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गोरगरिब रुग्णांवर शस्त्रक्रिया करता यावी, खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारापासून त्यांची सुटका व्हावी, रुग्णांच्या कोणत्याही आजारांवर सुलभ व दर्जेदार शस्त्रक्रिया करता यावी, या हेतूने सर्वोपचार रुग्णालयाने रोबोट मागणी केली आहे. दरम्यान, सरकार स्थापन झाले. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री ठरलेले नाहीत. त्यामुळे प्रस्ताव अद्याप सर्वोपचार रुग्णालयातच पडून आहे. रोबोटची उपलब्धता झाल्यास शस्त्रक्रियेची संख्या वाढणार असून त्यासाठी मनुष्यबळाचीही फार गरज भासणार नाही. यामुळे खेड्यापाड्यातील रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील नागपूर येथील सर्वोपचार रुग्णालयातच रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयाने रोबोटची मागणी केली आहे. 

शस्त्रक्रियेतील रोबोटचे फायदे... 
- शस्त्रक्रिया दर्जेदार व सुलभ होतील 
- शस्त्रक्रियेनंतर होणारा रक्‍तस्त्राव कमी होईल 
- वारंवार एकाच आजारांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही 
- शस्त्रक्रियेची संख्या वाढेल : पोट, छातीसह अन्य दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया सुलभ होतील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT