Rohit Pawar criticizes BJP 
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवार का म्हणाले, भाजपवाल्यांनो आता तरी सुधरा

सकाळ वृत्तसेवा

नगर - राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधी पक्षाकडून केवळ राजकारण केले जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तशी टीका होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट राज्यपालांनाच टार्गेट केलं. या राजकारणाबद्दल राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार वारंवार टि्वट करत असतात. कालही त्यांनी ट्विट करून भाजप नेत्यांवर शरसंधान साधले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाटेत कायदेशीर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाचे संकट उभे राहिले असतानाही भाजप नेत्यांना राजकारण सुचते आहे. किमान या आणीबाणीच्या काळात तरी सर्व पक्षांनी एकजुटीने लढा द्यायला हवा होता. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही टिपण्णी करीत आहेत. मात्र, रोहित पवार यांनी थेटपणे भाजप नेत्यांच्या राजकारणावर कोरडे ओढले आहेत.

राज्य कोरनाशी लढत आहे अन भाजप नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात. तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टाने त्यांचा स्वप्नभंग केला आहे. आता तरी त्यांनी सुधारलं पाहिजे. एका बाजूला भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता आहे, अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

भाजप नेत्यांकडून सरकारला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो. मुख्यमंत्री यांना कोणत्याच सभागृहाचे सदस्य मिळू नये यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. त्यावेळीही रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणाच्या पद्धतीवर टीका केली होती. कधी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर देताना दिसतात.

राज्यासमोर आता कठीण वेळ आहे. भाजपने आता राजकारण सोडून समाजकारण करावे, असे असा सल्ला देतानाही ते दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT