RSS review by PM Modi on corona disease 
पश्चिम महाराष्ट्र

मोदीजी लाईन पे है...चंद्रशेखरजी बोल रहे है क्या... पंतप्रधानांनी घेतला आरएसएसच्या स्वयंसेवकांकडून आढावा

विलास कुलकर्णी

राहुरी :  "हॅलो...  चंद्रशेखरजी....  गाव में हो | कैसा चल रहा हैं |" देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज कानी पडताच राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रचंड उत्साहीत झाले. दोन मिनिटांच्या संभाषणात कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना राहुरी तालुक्याचा व देवळाली प्रवरा शहराचा आढावा संगितला. आवर्जून फोन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. कोरोना विरुद्ध संघर्षासाठी कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

देवळाली प्रवरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून स्वयंसेवक असलेल्या कुटुंबाचे तिसऱ्या पिढीतील सदस्य शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रमणध्वनीवर संवाद साधला.
आज शनिवारी (सकाळी) नऊ वाजता माजी आमदार कदम यांचा भ्रमणध्वनी वाजला. "चंद्रशेखरजी कदम बात कर रहे है? प्रधानमंत्री मोदीजी आपसे बात करना चाहते है |" असे सांगून स्वीय्य सहाय्यक यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन दिला. कदम उत्साहीत झाले. क्षणार्धात पंतप्रधान मोदी यांचा चिरपरिचित धीरोदत्त आवाज कदम यांच्या कानी गुंजला.
      "हॅलो...  चंद्रशेखरजी बात कर रहे है |", 
      "जी हां मोदीजी मैं चंद्रशेखर कदम बोल रहा हूं |", 
      "गाव में हो?"
      "जी मोदीजी... मैं राहुरी तहसील मे देवलाली प्रवरा गाव मे रहता हूं |", 
      "आपके तहसील क्षेत्र में कोरोना की स्थिती कैसी है|"
      "मोदीजी... राहुरी तहसील क्षेत्र मे आज तक कोरोना बाधित एक भी रुग्ण नही है | ये हमारा सौभाग्य है | हमारे देवळाली प्रवरा गांव की सभी सीमा रास्ते बंद कर दिये है |  हमारे कार्यकर्ता सीमा के रास्ते में दिन-रात पहरा दे रहे है | बाहर का एक भी आदमी हमारे गाव मे नही आ सकता | देवळाली प्रवरा गाव मे हमने अन्नछत्र शुरू किया है | दीड हजार गरीब लोगों को दोपहर और रात को अन्न पॅकेट स्वयंसेवकोंद्वारा पहूंचाया जाता है |"
    "चंद्रशेखरजी.... आपका काम बहुत अच्छा चल रहा है | ऐसी ही डटे रहो | कोरोना के खिलाफ संघर्ष में आपका योगदान बहूमोल होगा | आपसे बात करके प्रसन्नता हुई |"
    "मोदीजी... देशभर मे कोरोना के खिलाफ आपका बहुत बडा संघर्ष चल रहा है | इस संघर्ष मे आपका काम बहुत अच्छा चल रहा है | हमारी शुभकामनाये आपके साथ है |
      "चंद्रशेखरजी....  ये लाढाई हमें जितनी है | आपकी शुभकामनायें हमारे लिए प्रेरणास्त्रोत है | आपका बहुत बहुत धन्यवाद |"
    अवघ्या दोन मिनिटांच्या या संभाषणाने पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत स्वयंसेवकांच्या कामाचा, त्यांच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला. स्वयंसेवकांचा कामाला बळ मिळेल. अशा शुभेच्छा दिल्या.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT