Rumors spread that the bank was crowded 
पश्चिम महाराष्ट्र

मोदींनी बँकेत पैसे टाकलेत, चला काढायला...मग उडाली झुंबड

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्याने अनेकांच्या हातांना काम नाही. त्यामुळे उपासमारीचे संकट येऊ नये, यासाठी केंद्राने महिलांच्या जनधन खात्यांवर प्रत्येकी 500 रुपये वर्ग केले. मात्र, हे पैसे खातेदारांनी वेळेत न काढल्यास पुढील काळात रक्कम मिळणार नसल्याची अफवा शहरात आहे. तसेच, हे पैसे परत जाण्याची भीतीही खातेदार महिलांना असल्याने, पैसे काढण्यासाठी बॅंकांसमोर त्या गर्दी करीत आहेत. शहरातील स्टेट बॅंक चौकात अशाच पद्धतीने मोठी रांग दिसून आली. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील महिलांच्या जनधन खात्यांमध्ये केंद्र सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 500 रुपये जमा केले आहेत. "हे पैसे काढून न घेतल्यास पुढील रक्कम मिळणार नाही,' अशी अफवा पसरल्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांची राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोर मोठी गर्दी होत आहे. 

जनधन योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर, ते परत जाण्याचा किंवा कपात होण्याचा प्रश्‍नच नाही. ही फक्त अफवा आहे. बॅंकांसमोर कोणीही गर्दी करू नये. अफवांवर विश्‍वास ठेवू नका. 
- राजीव कदम,

क्षेत्रीय अधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT