rupees 15 lakh theft from thief within 2 hours in belgaum sankeshwar 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : दोन तासांत 15 लाखांवर डल्ला; संगमेश्‍वरनगरात घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बनावट चावीच्या आधारे बंद घराचे कुलूप उघडून अवघ्या दोन तासांत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम, अशा एकूण १५ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. शुक्रवारी (२) रात्री ११ च्या सुमारास संगमेश्‍वरनगर येथे ही घरफोडीची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गौसमुद्दीन मैनुद्दीन तोरगल यांनी एपीएमसी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी गौसमुद्दीन यांची बहीण जक्रियाबानू यांचे संगमेश्‍वरनगरला घर आहे. त्या आपल्या कुटुंबीयांसोबत त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काल त्यांच्या नात्यातील सुभाषनगर येथे हळदी समारंभ असल्यामुळे त्यांच्या घरी हळदीला जाण्यासाठी पाहुणे आले होते. रात्री ९ च्या सुमारास जक्रियाबानू घराला कुलुप घालून कुटुंबीय व पाहुण्यांसोबत सुभाषनगर येथील हळदी समारंभाला गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत बनावट चावीच्या आधारे मागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील कपाटही बनावट चावीच्या आधारे उघडण्यात आले.

कपाटात ठेवण्यात आलेले चौदा लाख रुपये किमतीचे ४७० ग्रॅम वजनाचे (४७ तोळे) सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड, अशा एकूण पंधरा लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून पलायन केले. सर्वजण रात्री ११ च्या सुमारास घरी परतल्यानंतर घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळानंतर एपीएमसीचे पोलिस निरीक्षक दिलीपकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. 

दरवाजा व कपाटाचीही चावी

चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा आणि आणि कपाटही अगदी सहजरीत्या बनावट चावीच्या आधारे उघडले आहे. यावेळी कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा आदळआपट न करता चोरट्यांनी चोरी केली आहे. त्यामुळे या चोरीच्या प्रकाराबद्दल पोलिसांना संशय बळावला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT