In rural areas, Diwali begins with the creation of gavalni 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण भागात गवळणीच्या रचनेने दिवाळीला सुरवात 

अनिलदत्त डोंगरे

खानापूर : ग्रामीण भागात वसुबारसदिवशी दिवाळीसण सुरू होतो. या दिवसापासून घरोघरी महिला पहाटे उठतात. शेणसडा घालतात. त्यांच्या अंगणात इवलंसं एक नगरच वसते. बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट.

बळीराजाचं पुण्य खूप झालं. इतकं की त्याला देवांचा राजा करतील अशी शंका इंद्राला आली. भीतीनं विष्णूला साकडं घातलं. पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्याचं पूजन बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची आगळीवेगळी प्रथा विलक्षण आहे. 

हे आहे शेणापासून बनवण्यात येणारं नगर. तिथे असतो बळीराजा. काम करणाऱ्या गौळणी. नगराची वेस वसुबारसपासून पाडव्यापर्यंत एकेका थराने वाढत जाते. आधी झोपलेला बळीराजा नंतर गौळणी बनवतात. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन लंबगोल आकार द्यायचा. जमीनीवर दाबून बसवायचा. शेण थोडंसं घट्ट घ्यायचं. त्यांना डोके, हात चिकटवायचे. 

पुण्यशील राजा बळीच्या राज्यात आनंदीआनंद आहे. तयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजा सेवा करते. हे सगळं दाखवताना अवतरतात गवळणी. मुख्य असतो बळी. नगरीत दिसणारा एकमेव पुरूष निवांत पहुडलेला असतो. हातापाय, डोक्‍याशी थांबून गवळणी सेवा करतात. हे चित्र पाडव्यापर्यंत रोज बदलत जाते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: केडीएमसी निवडणुकीत भाजपचा विजयरथ सुरू; तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड, जाणून घ्या नावे

Tractor JCB Fraud : कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; पाच आरोपी अटकेत!

Viral: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय? केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर जाणून घ्या

Coconut Water In Winter: हिवाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य आहे का? पोषणतज्ञांनी सांगितलं धक्कादायक सत्य

Latest Marathi News Update : शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा, निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मागणी

SCROLL FOR NEXT