rise iron prices increased Ukraine and Russia sakal
पश्चिम महाराष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धामुळे स्टील दर तेजीत

प्रतिटन ८८ हजार रुपये; आजवरचा हा उच्चांकी दर, बाजारातही तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

सांगली: रशिया-युक्रेन युद्धाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम काही गोष्टींवर झालेला पाहायला मिळत आहे. युद्धाचा परिणाम म्हणून स्टीलचा दर प्रतिटन ८८ हजार ६०० (जीएसटीसह) रुपये इतका झाला आहे. आजवरचा हा उच्चांकी दर मानला जात आहे. दोन ते तीन आठवड्यात प्रति टन तब्बल २० हजार रुपये वाढ झाली आहे. सध्या स्टीलचा तुटवडाही जाणवू लागलाय. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर संकट ओढवले आहे.

रशिया-युक्रेनमध्ये काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धाची झळ विविध क्षेत्रांना जाणवू लागलीय. युद्धामुळे स्टीलच्या दरात भरमसाट वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युक्रेन हा मॅग्निज लोहखनिज निर्यात करणारा प्रमुख देश मानला जातो. युद्धामुळे कच्च्या मालाची आवक थांबली आहे. त्यामुळे स्टील उत्पादक कंपन्यांना कच्चा माल मिळणे अवघड झाले. तसेच, युद्धामुळे झालेल्या अन्य गोष्टींच्या भाववाढीचा परिणामही स्टीलच्या दरावर झाला आहे.

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी स्टीलचा दर ६८ हजार रुपये प्रतिटन होता. तो दर वाढत जाऊन सध्या ८८ हजार रुपये प्रतिटनापर्यंत पोहोचला आहे. ही वाढ आजवरची ऐतिहासिक म्हणावी लागेल. तशातच काही स्टील उत्पादक कंपन्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्टीलचा तुटवडा भासत आहे. अशीच स्थिती राहिली तर स्टीलच्या दरात आणखी वाढ संभवते.

स्टील दरातील वाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या बांधकामावर परिणाम जाणवत आहे. ज्यांनी महिन्यांपूर्वी स्टील खरेदी करून ठेवले आहे, त्यांना कोणती अडचण नाही. परंतु, नवीन स्टील खरेदी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक तसेच वैयक्तिक खरेदीदारांपुढे भाववाढीचे संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी स्टील दरातील वाढीमुळे बांधकामे थांबतील असे चित्र आहे. बांधकाम क्षेत्रात स्टीलला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यावरच मोठी बांधकामे अवलंबून आहेत. त्यामुळे अनेकांना युद्धाचे ढग निवळण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fire Tragedy : बाईकला धडकून स्लीपर बस पेटली, २० जण जिवंत जळाले; ४० जण करत होते प्रवास...

Leopard Falls Into Well : शिकार करायला गेला अन् शिकारी झाला! रत्नागिरीत बिबट्या विहिरीत पडल्याचा थरारक प्रकार

Latest Marathi News Live Update : पुढील तीन दिवस नाशिकसह घाट परिसराला यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

Washim Crime: आमखेड्यात समाजातील वादातून युवकाचा खून; चार गंभीर जखमी विनाक्रमांकाच्या दुचाकी सोडून हल्लेखोर फरार

AI Greeting Cards: तंत्रज्ञानाच्या युगात भावनाही झाल्या डिजिटल; शब्दांऐवजी डिजिटल पत्राद्वारे भावना व्यक्त

SCROLL FOR NEXT