पश्चिम महाराष्ट्र

Bullockcart Race : रूस्तूम ए हिंद बैलगाडा शर्यतीचा थरार , महिब्या-बकासुर जोडीने जिंकली 'थार गाडी'

भाळवणी (ता. खानापूर) येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तूम- ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला.

सकाळ वृत्तसेवा

भाळवणी (ता. खानापूर) येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तूम- ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला.

विटा - भाळवणी (ता. खानापूर) येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तूम- ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीत १९ लाख रुपयांच्या महिंद्रा थार गाडीचा मानकरी कऱ्हाड तालुक्यातील रेठऱ्याचा सदाभाऊ कदम यांचा ‘महिब्या’ आणि सचिनशेठ घरात, मोईनशेठ धुमाळ यांचा ‘बकासूर’ ही बैलजोडी विजयाची मानकरी ठरली.

सांगली जिल्ह्यातील या मैदानात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम, आमदार नीलेश लंके, संतोष वेताळ, आमदार अनिल बाबर, तासगावचे नेते रोहित पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह राज्यातील राजकीय व अन्य क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थ व बैलगाडी शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांसाठी पट्ट्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षागॅलरी उभारली आहे.निकालामध्ये गोंधळ होऊ नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय आजपर्यंतच्या मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर पुरेशी प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली होती.

बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांची नावे, गाव व बक्षीस पुढीलप्रमाणे - पहिला क्रमांकाचे मानाची गदा, चषक आणि महिंद्राची थार - (रेठरे) येथीस सदाभाऊ कदम यांचा महिब्या-बकासूर, दुसरा क्रमांक – ट्रॅक्टर आणि चषक- शंभू-रोमर बैलजोडी- आरोही मोहन देडगे (नांदेड सिटी), तिसरा क्रमांक- ट्रॅक्टर आणि चषक- वजीर-नियादी बैलजोडी- गुड्डी रतन म्हात्रे (सागाव- डोंबवली), चतुर्थ क्रमांक- दुचाकी- निसर्ग गार्डन (कात्रज), पाचवा क्रमांक- दुचाकी- सूर्या-रवार बैलजोडी- नियती भीमराव भूतकर (रामूसवाडी),सहावा क्रमांक- दुचाकी रणवीर पाटील (कल्याण), सातवा क्रमांक- सर्जा-रणवीर बैलजोडी- जावेद मुल्ला (तांबवे), तर सेमी फायनलमधील दुसऱ्या क्रमाकांवर राहिलेल्या गाड्यांचा दुसरा अंतिम राऊड घेण्यात आला असून यातील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत.

क्वार्टर फायनल निकाल - मुकाई प्रसन्न- शंभू बाजी ग्रुप (खडकवासला), पृथ्वीराज सयाजी बाबर (गार्डी), पै. सचिन चव्हाण (वाई), गुड्डी अजय शेठ (गार्डी), समीर महादेव भोईर (मोठागाव), वरूण पाटोळे (मायणी), ज्ञानेश्वरी देवदत्त पाटील (साखराळे). विस्तीर्ण मैदान, भव्य-दिव्य स्वरूप व नेटके संयोजन यामुळे अत्यंत चुरशीच्या व खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात डोळ्याचे पारणे फेडणारे बैलगाडी मैदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT