Ryder X 
पश्चिम महाराष्ट्र

स्फोटकांचा शोध लागणार आता काही क्षणात ; देवराष्ट्रेच्या दिपकचे संशोधन

वीस हुन अधिक स्फोटके काही क्षणात शोधण्याची किमया

स्वप्नील पवार

सांगली : देवराष्ट्रे गावास ऐतिहासिक वारसा आहे. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारे यशवंतरावजी चव्हाण,महाराष्ट्राचे शिल्पकार यांची ही जन्मभूमी,या गावात देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण वन्यजीव सागरेश्वर अभयारण्य आहे. याच गावातील  युवक संशोधक दीपक कुंभार यानी देशातील पहिले स्फोटक शोध यंत्र तयार करून देवराष्ट्रेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

देवराष्ट्रे येथील दीपक कुंभार हा बंगळूर येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थेत कार्यरत आहे. देशातील पहिले स्फोटक शोध यंत्र दीपक कुंभार यांनी दोन सहकार्याच्या मदतीने तयार केले आहे. उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन व बंगळूर येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था(आयआयएससी)यांनी संयुक्तरीत्या रायडर एक्स शोध यंत्र उपकरण विकसित केले आहे. रायडर एक्स तयार करण्यासाठी दीपक व त्याच्या टीमला  दोन वर्षांचा कालावधी लागला कैकदा वाटले की हे उपकरण आपल्यालाकडून होणार नाही. परंतु जिद्द,परिश्रमाची तयारी असली की संकटे आपल्याला रोखू शकत नाही.शोध स्फोटक यंत्र तयार करायचेच असा ध्यास दिपकने घेतला होता.रात्र-दिवस दीपकसह टीम उपकरणासाठी काम करीत होती.एक दिवस तो सुवर्णक्षण आला आणि रायडर एक्स उपकरण यशस्वीरीत्या तयार झाले.

रायडर एक्स या तंत्रज्ञानामुळे आता दहशतवादी  हल्ल्यात वापरणाऱ्या येणाऱ्या स्फोटकांचा शोध घेणे शक्य होणार आहे. वीस हुन अधिक स्फोटके काही क्षणात शोधण्याची किमया या रायडर एक्स उपकरणात आहे. दीपक व त्याच्या टीमचे सर्वत्र कोतुक होत आहे. हे शोधयंत्र  विकसित करण्यासाठी "एचईएमआरएल"चे संचालक के. पी. एस. मूर्ती यांचे योगदान आहे. हे उपकरण राष्ट्रीय संरक्षण खात्याकडे सुपूर्त केले आहे.

रायडर एक्स हे  स्फोटक शोध उपकरण करीत असताना खुप अडचणी आल्या हे आपल्याकडून होणार नाही असे बऱ्याचदा वाटत होते पण आपण आपल्या देशासाठी हे उपकरण तयार करीत आहोत व आपण हे उपकरण तयार करायचेच असा मनाशी निर्धार केला होता. दोन वर्षांच्या परिश्रमानंतर रायडर एक्स यशस्वीरीत्या तयार झाले.

 दीपक कुंभार

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT