टप्पा (जि. सोलापूर) - बंधूभेटीसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत सोपानदेव यांच्या शेजारीशेजारी उभे असलेले पालखी रथ. 
पश्चिम महाराष्ट्र

#SaathChal रिंगणाचा आनंद अन्‌ बंधुभेटीची भावुकता

विलास काटे

भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते.

सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा जवळ आला आणि माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने वारकरी भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या.

वेळापूरजवळ धावा झाला की पंढरपूर जवळ आल्याची चाहूल लागते. गुरुवारी रात्री लाखो भाविकांनी वेळापुरात मुक्काम केला व भल्या पहाटे सोहळ्याबरोबर भंडीशेगावकडे मार्गस्थ झाले. सकाळी ठाकूरबुवाच्या समाधीजवळ सोहळ्यातील तिसरा गोल रिंगणाचा सोहळा अश्वाने दोन फेऱ्या मारून पूर्ण केला. रिंगणानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात रंगलेल्या उडीच्या खेळात अवघे वारकरी रंगून गेले. ज्ञानोबा- माउलीच्या जयघोषात परिसर दणाणून गेला. त्यानंतर सोहळा चालू लागला तोंडले बोंडलेच्या दिशेने. दुपारी नंदाच्या ओढ्यातून पालखी सोहळा जात असताना वय विसरून वारकरी एकमेकांवर पाणी उडवत आनंद घेत होते. ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याने टप्प्याजवळ पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला. तेथे पालखी सोहळा थांबला. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेवांचा सोहळा तेथे आला. दोन्ही भावांच्या पालख्यांचे रथ एकमेकांशेजारी चिकटून लावण्यात आले. दोन्ही संस्थान मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद दिला. बंधूभेटीचा सोहळा लाखो भाविकांची डोळ्यात साठविला. सव्वासातशे वर्षांपूर्वी भावंडाची ताटातूट झालेला प्रसंग आठवून भाविकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 

तोंडले- बोंडले येथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव या प्रमुख पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला. पंढरपूरचा रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला.

वारीत आज
    पालखीचा वाखरीला मुक्काम
    गोल आणि उभे रिंगण रंगणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: “जरांगेनीच माझ्यावर हल्ल्यासाठी सुपारी दिली”; अमोल खुणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “आता सुट्टी देणार नाही”

Nalasopara: लग्नाचे आमिष दाखवून हिंदू तरुणीवर वारंवार अत्याचार, ७०-८० तरुणींना फसवलं; अश्लील व्हिडिओ अन् फोटो काढत...

समोर समुद्र, मोठाला वऱ्हांडा... जिम ट्रेनरने दाखवलं कसं होतं नाना पाटेकरांचं गोव्यातलं घर; ती जागाही जिथे...

Navratri Day Three: आज नवरात्रीची तिसरी माळ! करा देवी चंद्रघंटेची पूजा; जाणून घ्या कथा, पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला ICC चा मोठा पुरस्कार, विश्वविक्रमही झाला; शफाली वर्माचाही सन्मान

SCROLL FOR NEXT