Sachin Tendulkar took a Sai Darshan ahmednagar news 
पश्चिम महाराष्ट्र

सचिन... सचिन... शिर्डीत जयघोष

सतीश वैजापूरकर

शिर्डी : "सचिन, सचिन' अशा जल्लोषात हात उंचावत चाहत्यांनी केलेले जोरदार स्वागत स्वीकारत, आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुटुंबीयांसमवेत येथे येऊन साईसमाधीवर माथा टेकला. शिर्डी माझे पंढरपूर ही बाबांची छोटी आरतीदेखील केली. मंदिरातून बाहेर पडताना रस्त्याने दुतर्फा जमलेल्या चाहत्यांचे अभिवादन आनंदाने स्वीकारत तो पुन्हा विमानतळाकडे रवाना झाला.

दुपारी अडीचच्या सुमारास त्याचे चार्टर प्लेनने शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईमंदिर परिसरात त्याच्या स्वागतासाठी विविध प्रांतांतून आलेले भाविक व चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे त्याच्या मंदिरात जाण्याच्या मार्गावर दुतर्फा अडथळे उभारले होते. पावणेतीनच्या सुमारास आलिशान मोटारीतून तो मंदिर परिसरात आला.

सुरक्षारक्षकांच्या गराड्यात साईमंदिरात

पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मोठा भाऊ अजित यांच्यासह दहा सदस्य त्याच्या समवेत होते. निर्मनुष्य केलेल्या मार्गावरून सुरक्षारक्षकांच्या गराड्यात हे सर्व जण साईमंदिरात गेले. तेथेही रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. चाहत्यांना अभिवादन करीतच पुढे जाऊन त्याने साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तेथे गर्दी केल्याने त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना समाधीपासून दूर उभे राहण्याची वेळ आली.

अधिक माहितीसाठी- अखेर भाजपचे कारभारी ठरले

साईबाबांची संगमरवरी मूर्ती देऊन सत्कार

साईदर्शनानंतर संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी सचिनचा साईबाबांची संगमरवरी मूर्ती देऊन सत्कार केला. 

व्हिजिटिंग बुकला फाटा देऊन फोटोसेशन!

महत्त्वाच्या व्यक्ती साईदर्शनासाठी आल्या की साई संस्थानातर्फे त्यांचे स्वागत केले जाते. साईदर्शनानंतर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी त्यांच्यासमोर व्हिजिटिंग बुक ठेवण्यात येते. त्यात ते आपल्या भावना नोंदवितात. ही नोंदवही सांभाळून ठेवली जाते. या प्रथेला अलीकडे फाटा देण्यात आला. त्याऐवजी दर्शनासाठी आलेल्या सेलिब्रिटींसमवेत सपत्नीक फोटोसेशन करण्यात संस्थानचे वरिष्ठ अधिकारी धन्यता मानतात. आज पुन्हा त्याची प्रचिती आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT