sadabhau khot criticized on electricity bill on state government in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

शिवजंयतीला वीजबिलांची होळी, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सदाभाऊंचा घणाघात

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : आटपाडी येथे आंब्याच्या बागेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विजबिलांची होळी करुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    
यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाला हात लावणाऱ्यांची गय केली जात नव्हती. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा मंत्री यांनी वीजबिल माफीची घोषणा केली आणि आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची फसवणूक केली आहे. म्हणून रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर वीज बिलाची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

हेही वाचा - जयंत पाटील यांच्या खेळीने भाजप घायाळ का ? ९ नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल -
    
दरम्यान शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत वीजबिल आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत, विजबिलांची होळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत महाविकास आघाडी विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी जेष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, सभापती भूमिका बेरगळ, उपसभापती दादासाहेब मरगळे, विलास कळेबाग, माजी उपसभापती नारायण चवरे, मार्केट समितीचे व्हा. चेअरमन दिलीप खिलारी उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT