पश्चिम महाराष्ट्र

'शेतकऱ्यांच्या पोरांनी सरकारची दादागिरी पायाखाली तुडवलीच'

स्नेहल कदम

एका रात्रीत बैलगाडी शर्यतींचा ट्रॅक बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले.

सांगली - कडक पोलिस बंदोबस्त आणि प्रशासनाला चकवा देत आज पहाटेच्या सुमारास झरे (जि. सांगली) येथे बैलगाडी शर्यती पार पडल्या. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या शर्यतींचे आयोजन केले होते. परंतु एका रात्रीत बैलगाडी शर्यतींचा ट्रॅक बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. यावेळी महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी तिथे प्रमुख उपस्थितीत असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर ट्वीटद्वारे टिका केली आहे.

ते म्हणतात, महाविकास आघाडी सरकारने बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी नको ते प्रयत्न केले. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अखेर सरकारची दादागिरी पायाखाली तुडवत गनिमी काव्याने शर्यत पार पाडली. सरकारच्या छाताडावर माझा महाराष्ट्र बैलगाडी धारक आज आनंदाने उभा राहिलेला पाहायला मिळत असल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले आहेत.

दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदीचा आदेश झुगारून झरेत बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचे आयोजन केले होते. या शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी मैदान उद्ध्वस्त केले होते. झरे परिसरात कडक पोलिस बंदोबस्तही ठेवला होता. परंतु प्रशासनाचा आदेश झुकारून राज्यभरातून हजारो तरुण शेतकरी यात सहभागी झाले. यावेळी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन उभा करून त्याला साथ देण्याचे आवाहन पडळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT