पश्चिम महाराष्ट्र

'मुख्यमंत्री साहेब, शाब्दिक धीराची गरज नाही तर...' - सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

हातातोंडाशी आलीले पिकं रानात भुईसपाट झाली आहेत. त्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ते सांगावे?

गुलाब चक्रीवादामुळे वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा सर्वात मोठा फटका मध्य महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या प्रतिक्रीयेवरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करुन सवाल उपस्थित केला आहे.

ते म्हणतात, मुख्यमंत्री साहेब माझा माय बाप शेतकऱ्याला.. शाब्दिक धीराची आवश्यकता नाही, तर आता आर्थिक मदतीचा हात हवा आहे. तो कधी मिळेल ते सांगा? पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलीले पिकं रानात भुईसपाट झाली आहेत. त्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ते सांगावे? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशीही चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT