Safe place for animals; Rapid migration of families 
पश्चिम महाराष्ट्र

जनावरे सुरक्षित स्थळी; कुटुंबांचेही वेगाने स्थलांतर

शंकर भोसले

मिरज : कृष्णाघाटावर कृष्णेची पाणीपातळी आज 48 फुटांवर गेली. शेतातील वस्त्यांत पाणी शिरल्यामुळे आज दिवसभर येथील शेतकऱ्यांनी जनावरे मिरज शहरात सुरक्षित स्थळी हलवून कुटुंबांचेही स्थलांतर वेगाने सुरू केले.

दरम्यान, परिस्थितीची पाहणी मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल, मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी केली. जिल्हा बंदीच्या अनुषंगाने पुरस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना स्थलांतरासाठी सांगली येथे तर सांगली येतील नागरिकांना कोल्हापूर येथे स्थलांतरासाठी सोडण्याचे आदेश दिले. 

सध्या कृष्णा घाटावरील आठ पैकी एक बुरुज शिल्लक आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वारणा धरणातूनदेखील विसर्ग सुरू असल्याने दिवसभरात पाणी पातळीत दहा फुटांनी वाढ झाली. कोयना धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रात्री 40 फुटांवर असलेली पातळी सायंकाळपर्यंत 48 फुटांवर गेली. दिवसभरात आठ फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. 

गतवर्षी महापुराने कृष्णाघाट परिसरात हाहाकार माजला होता. दहा दिवस कृष्णाघाट परिसर पाण्याखाली होता. यंदादेखील सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णाघाट परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले. त्यामुळे कृष्णाघाट परिसरातील नागरिकांचे डोळे पाणी पातळीकडे आहेत. 

पुरस्थितीत जिल्हाबंदी नाही 
पुराच्या पाणी पातळी वाढ होत आहे हे लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाबंदी उठवण्यात आल्याचे इचलकरंजी व मिरजेच्या प्रांताधिका-यांनी जाहीर केले. अर्जुनवाड कृष्णाघाट येथील नागरिकांना स्थलांतराच्या अनुषंगाने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईकांकडे जाण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा बंदी आदेश लागू राहणार नाही.. 

प्राधान्याने स्थलांतर 
गतवर्षी पुरात अनेक जनावरे वाहून गेल्यामुळे यंदा नागरिकांनी जनावरांचं स्थलांतर आत्ताच सुरू केले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने कुटुंबाच्या स्थलांतराचाही आढावा अधिका-यांनी घेतला. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT