Sahyadri-Tiger-Reserve 
पश्चिम महाराष्ट्र

‘सह्याद्री’ प्रकल्पातील महिला बनवणार सात लाख पिशव्या

शैलेन्द्र पाटील

सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालर क्षेत्रातील गावांत राहणाऱ्या महिलांना सात लाख कापडी पिशव्या शिऊन तयार करण्याचे काम मिळाले आहे. या कामामुळे दुर्गम वाडी- वस्तीवर राहणाऱ्या सुमारे २०० महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. दुर्गम भागातील स्थानिकांच्या शाश्‍वत विकासासाठीच्या प्रयत्नांना सामाजिक बळ मिळू लागल्याची ही सुचिन्हे आहेत. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रातील (बफर झोन) गावांत डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन- वन विकास योजना राबवली जाते. प्रकल्पाच्या झालर क्षेत्रातील ही गावे १५ ते जास्तीत जास्त २५ घरांच्या वस्त्या असतात. गावातील बहुतांश तरुण रोजगारासाठी मुंबई, पुण्याबरोबरच साताऱ्यात असतात. पश्‍चिमेकडील डोंगररांगेतील या गावांत दळणवळणाची साधने नाहीत. आता कुठे या गावांपर्यंत वीज पोचली आहे. मात्र, रस्ते, चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा, दळणवळणाची आधुनिक साधने, संपर्क यंत्रणा आदी मूलभूत गरजांपासून ही गावे दूर आहेत. डोंगर उतारावरील शेती लहरी पावसावर अवलंबून असते. भात, नाचणीशिवाय इतर पिके येत नाहीत. अशा या स्थानिकांच्या शाश्‍वत विकासासाठी शासनाने जन-वन विकास योजनेंतर्गत योजना राबविली. त्याअंतर्गत गावांतील महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आधुनिक शिलाई मशिन्स देण्यात आल्या आहेत. गीता परळकर यांनी या महिलांना शिलाई प्रशिक्षणही दिले आहे. 

प्लॅस्टिक बंदीमुळे कापडी पिशव्यांच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे या पिशव्यांना मागणी आहे. विविध ठिकाणांहून ऑर्डर येऊ लागल्या आहेत. नुकतीच या महिलांना सात लाख पिशव्या शिऊन देण्याचे काम मिळाले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका डॉ. विनिता व्यास यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. पुण्यातील कंत्राटदाराने पिशव्या शिवण्याचे काम सह्याद्री प्रकल्पातील महिलांना दिले आहे. कच्चा माल, तसेच वाहतूक खर्च तो कंत्राटदारच करणार असल्याने या महिलांना घरी काम मिळाले आहे.

कामाचा उरक लक्षात घेऊन ही ऑर्डर सुमारे २५ लाख पिशव्यांपर्यंत जाऊ शकते, असेही डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले. या कामामुळे जिल्ह्यातील निगडे, रासाटी (ता. पाटण), अकल्पे (महाबळेश्‍वर), तिवरे (ता. चिपळूण), उंबरीवाडी (ता. जावळी) आदी गावांतील सुमारे २०० महिलांच्या रोजगारास चालना मिळेल.

डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत झालर क्षेत्रातील स्थानिकांच्या शाश्‍वत विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. दहा गावांतील महिलांना शिलाई कामाचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांना घरबसल्या काम मिळाल्याचे मोठे समाधान आहे
- डॉ. विनिता व्यास, संचालिका, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT