पश्चिम महाराष्ट्र

Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला घाबरून टाकणाऱ्या अफवांचे पीक सोशल मीडियावर जोमात असतानाच गुढे (ता. पाटण) येथील सई विनोद बडेकर ही पाच वर्षांची चिमुरडी मात्र कोरोनाला गनिमी काव्याने हरविण्याचा संदेश व्हिडीओद्वारे लोकांना देत आहे. पोलिसाच्या वेशात कोरोनाबाबत जनजागृती करणारे तिचे संदेश सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर कौतुकाच्या कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
 
सई ही आकुर्डी-पुणे येथे ज्युनिअर केजीमध्ये शिकते. सध्या ती आजोळी कोल्हापुरात आईसोबत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील जनजागृती करणारे तिचे व्हिडीओ कौतुकाचा विषय बनले आहेत.

"हे सुंदर जग बघण्यासाठी आपण नऊ महिने आईच्या पोटात बसलो होतो, मग पुढंच जग बघण्यासाठी आपण आणखी काही दिवस घरात बसू शकत नाही का, असा सवाल करत तिने प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील भेटीचा ऐतिहासिक प्रसंग डोळ्यासमोर उभा करत "तुम्ही घराबाहेर पडण्याची वाट बघत दारात उभ्या असलेल्या कोरोनारुपी शत्रूला संयम आणि गनिमी काव्याने संपवा, असा संदेश तिने व्हिडीओद्वारे दिला आहे. पोलिसाच्या वेशात तयार केलेल्या या व्हिडिओवर सध्या लाईकचा वर्षाव सुरू आहे. त्याचबरोबर "हारायच न्हाय गड्या, रडायचं न्हाय, कोरोनाला हरवून टाकायचं हाय' या कवितेवरील तिच्या व्हिडीओलाही सध्या सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळत आहे.


सात जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 2, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 2, ग्रामीण रुग्णालय, कोरेगांव येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 1 अशा एकूण 7  अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
  काल दि. 15 एप्रिल रोजी रात्री उशीरा मुंबई व इतर ठिकाणाहून प्रवास करुन आलेल्या 5 नागरिकांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात  तर ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 6 नागरिकांना  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे असे एकूण 11 जणांना अनुमानितांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी कोरेगांव येथील 2 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. उर्वरित 9 या  जणांचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
 
तसेच कृष्णा हॉस्पिटल कराड येथे विलगिकरण कक्षात दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाच्या घशातील स्त्रावांचा नमुना 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणी करीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्याच्या घरात सापडली 16 जिवंत काडतुसे; संशयित फरार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 

CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध त्यांचे सुरूच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका

Mercury Transit 2025: बुध ग्रहाचा मघा नक्षत्रात गोचर; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल धनलाभ!

Nasik Police : ‘डायल ११२’ वर कॉल करा आणि ४ मिनिटांत पोलिसांना बोलवा! नाशिक पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ देशात सर्वोत्कृष्ट

SCROLL FOR NEXT