पश्चिम महाराष्ट्र

चला, फिटनेस जपूया, निरोगी राहूया...!

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने शनिवारी (ता. १६) महासूर्यनमस्कार तर रविवारी (ता. १७) फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रम होणार आहेत. मेरी वेदर मैदानावर होणाऱ्या या उपक्रमांसाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून ‘चला, फिटनेस जपूया, निरोगी राहूया’ असे आवाहन सहभागी विविध ग्रुप्स व संस्थांनी केले आहे.  

सकाळ माध्यम समूहातर्फे वर्षभर आरोग्यदायी उपक्रम राबविले जाणार असून, त्याचाच हा उपक्रम एक भाग आहे. दोन दिवसांच्या या उपक्रमाला रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंटरचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 

सूर्यनमस्कार हा प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार असून विशेषतः शालेय मुलांसाठी सूर्यनमस्कार अत्यंत उपयुक्त ठरतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला वेळ देणे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे फॅमिली फन रनच्या माध्यमातून रविवारी सुटीच्या दिवशी सहकुटुंब आनंद लुटता येणार आहे. झुम्बा हा एक व्यायाम प्रकार असून तो सर्वांसाठीच निरामय आरोग्य देणारा आहे. या पार्श्‍वभूमीवर हे उपक्रम होणार आहेत. 
डॉ. प्रांजली धामणे यांच्याकडून निरोगी आरोग्याच्या टिप्स तर विशाल गुडूळकर धावण्याचे मार्गदर्शन करतील. पुण्यातील ‘विवर्त’च्या संस्थापिका ऋतुजा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झुम्बा डान्स हा उपक्रम होणार आहे. 

निरोगी आयुष्य कसे जगावे, त्यासाठी धावण्याचे महत्त्व, धावण्यापूर्वी कोणता व्यायाम असावा, त्याचे फायदे काय आहेत, झुम्बा डान्स हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार कसा आहे, तो नेमका कसा करावा, याविषयीची माहिती तज्ज्ञांकडून यावेळी दिली जाणार आहे. या उपक्रमांत शहर आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये, तालीम संस्था, मंडळे, महिला संस्थांसह विविध आरोग्य संस्थांचा सहभाग असेल. 

दरम्यान, विविध शाळा, महाविद्यालये, सेवाभावी, आरोग्य सेवा संस्थांसह हेल्थ क्‍लब, हास्य क्‍लब, तरुण मंडळे व तालीम मंडळांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल. चला, तर मग, या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊया. आपल्यासह मित्रपरिवार, नातेवाइकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेऊया...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT