Sambhaji Bhide Google
पश्चिम महाराष्ट्र

वॉरंट जारी प्रकरण; संभाजी भिडे न्यायालयात हजर

आचारसंहिता उल्लंघनाबाबत संभाजी भिडे यांच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : आचारसंहिता उल्लंघन आरोपाखाली दाखल गुन्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांना वॉरंट जारी झाला होता. त्यानुसार श्री भिडे गुरुजी मंगळवारी (ता.२८) बेळगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात (Court) हजर झाले.

भिडे गुरुजी यांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दाव्याच्या सुनावणीला कोविड, लॉकडाऊन आणि कारणांनी त्यांना हजर होणे शक्य झाले नाही. यामुळे न्यायाधीशांनी त्यांना वॉरंट बजाविला होता. त्याप्रमाणे भिडे गुरुजी मंगळवारी उपस्थित राहिले. येळ्ळूर गावात ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी यात्रेनिमित्त १२ एप्रिल २०१८ रोजी येळ्ळूरमधील महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचे उद्‍घाटन भिडे गुरुजी यांच्याहस्ते झाले. या दरम्यान विधानसभा निवडणूक कर्नाटक होती. महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांना विजयी करण्याबाबतचे आवाहन केले होते. महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन केले. याला निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविला.

भिडे गुरुजीसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, मारुती परशराम कुगजी (मयत), प्रदीप देसाई, डी. जी. पाटील, मधू पाटील, विलास मोनाप्पा नंदी, भोला उर्फ नागेंद्र पाखरे, दुद्दाप्पा बागेवाडी आणि लक्ष्मीकांत मोदगेकर यांच्यावर बेळगाव ग्रामीण ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला. या दाव्याची मंगळवारी सुनावणी झाली आणि त्यात भिडे गुरुजी न्यायालयात हजर झाल्यामुळे वॉरंट मागे घेण्यात आला. दाव्याची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे. शिवप्रतिष्ठाण हिंदूस्तानतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंच्चण्णावर काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT