पश्चिम महाराष्ट्र

खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षाला अटक

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर - साखर कारखाना निवडणुकीतील उमेदवार अर्जांची प्रसिद्धी नोटीस बोर्डावर का लावली नाही, यात आपण पदाचा गैरवापर करत आहात अशी माहिती, ‘माहितीच्या अधिकारा’त मागवून १० लाखांची खंडणी स्वीकारताना संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (रा. कासेगाव) याला पोलिस  उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याचा साथीदार वाळवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा विश्‍वनाथ जंगम यालाही इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याची जानेवारी २०१७ मध्ये निवडणूक लागली होती. निवडणुकीसाठी तुषार ठोंबरे हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर अमोल डफळे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात होते. या दरम्यान वाळवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा जंगम यांनी १० जानेवारी २०१७ रोजी एक अर्ज केला. त्या अर्जात निवडणूक उमेदवार अर्जांची प्रसिद्धी नोटीस बोर्डावर का केली नाही अशी विचारणा अमोल डफळे यांच्याकडे केली होती.

डफळे इस्लामपूर येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून काम पाहतात. वास्तविक जंगम याने हा अर्ज ठोंबरे यांच्याकडे करायला पाहिजे होता. मात्र तसे न करता त्याने अर्ज डफळे यांच्याकडे केला. त्यानंतर २३ जानेवारी २०१७ ला राज्य  निवडणूक प्राधिकरणकडे अर्ज करून जंगम याने डफळे यांच्या चौकशीची मागणी केली. यावर निवडणूक प्राधिकरणाने अर्जात कसलेही तथ्य नाही असे उत्तर दिले.

त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१८ मध्ये औंधकर याने निवडणूक प्राधिकरणाकडे अर्ज करून तुमचा २६  डिसेंबर २०१८ ला ‘बेशरम अधिकारी’ म्हणून सत्कार करणार असल्याचे कळवले. यावरही आपल्या तक्रारीत कसलेही तथ्य नाही असे आयोगाने कळवले. त्यानंतर कासेगाव येथे एका कार्यक्रमात डफळे यांची औंधकर याने भेट घेतली. पैसे द्या, जंगम व मी तक्रार मागे घेतो असे सांगितले. परत १९ जानेवारीला डफळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून आपला बेशरम अधिकारी म्हणून ७ फेब्रुवारीला सत्कार करणार असल्याचे कळवले. त्यानंतर सोमवारी (ता.२८) डफळे यांनी औंधकर याला कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी औंधकरने पैसे मागितले. 

कार्यालयातील कर्मचारी काळेबाग यांच्याकडे एक चिठ्ठी दिली व या चिठ्ठीत रावळ, चौधरी, ठोंबरे, डफळे या अधिकाऱ्यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख या प्रमाणे दहा लाख रुपयांची लेखी मागणी केली. याचे पोलिसांनी रेकॉर्डिंग केले. आज त्याला पकडण्यासाठी पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आराखडा तयार केला. खाली व वर दोन दोन हजाराच्या नोटा लावून त्यामध्ये आत नोटांच्या आकाराचे कागदाचे तुकडे  भरले. असे पाच बंडल करून त्याचे रेकॉर्डिंग केले व सायंकाळी सात वाजता इस्लामपूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात औंधकर व जंगम यांना पैसे नेण्यासाठी बोलवले.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेडगे व मयुरेश श्रीराम या दोघांना  पंचांसमक्ष पाठवले. बंडलांचा पंचनामा केला. सात  वाजता सुयोग औंधकर एकटाच पैसे नेण्यास आला. खंडणी घेताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तर जंगम हा काही कामामुळे आला नाही. 

माहिती अधिकार व इतर कोणत्या प्रकरणात या दोघांनी आणखी काही अधिकाऱ्यांना किंवा तालुक्‍यातील ठेकेदारांना खंडणी मागितली असेल किंवा घेतली असेल तर त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यांच्या मुसक्‍या आवळू.
- कृष्णात पिंगळे,
पोलिस उपअधीक्षक, इस्लामपूर

लग्नातील आहेर चर्चेचा विषय
माहिती अधिकाराच्या नावाखाली अनेक अधिकारी व नेत्यांनाही आतापर्यंत गंडा घातला आहे. एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात गावातील मोजकेच वऱ्हाडी होते. मात्र सांगली जिल्ह्यातील बडे अधिकारी किंवा त्यांचे सहाय्यक लग्नाला हजर होते. ते लग्न तालुक्‍यात चर्चेचा विषय होते. प्रत्येक अधिकाऱ्याने  पाच, दहा, वीस हजार रुपयांचे पाकीट त्या लग्नात भेट दिले. त्या लग्नातील आहेर तालुक्‍यात चर्चेचा विषय  होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT