पश्चिम महाराष्ट्र

मराठा तरुणांनी स्वतःचा उद्योग चालू करावा - खासदार  संभाजीराजे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मराठा समाजाच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, कष्ट, जिद्द, आणि सयंमाच्या जोरावर उद्योगधंद्यात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

मराठा उद्योजक लाँबीच्यावतीने आज कोल्हापूरात मराठा युवकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संघटनांची उभारणी केली होती. त्यांची दुरदृष्टी लक्षात घेऊनच सर्वांनी वाटचाल होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मराठा समाज हा लढाऊ समाज आहे. तो कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार असतो. एकेकाळी सदन असलेला हा समाज आज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला झाला आहे. या समाजाला आरक्षण मिळायला हवे, आणि ते मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

-  संभाजीराजे छत्रपती 

यावेळी अनेक मराठा समाजातील युवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT