पश्चिम महाराष्ट्र

सम्राट महाडिकांचा पक्ष कोणता?

शिवाजीराव चौगुले

शिराळा - कोल्हापुरातील शिवाजी चौकातील महागणपतीच्या व्यासपीठावरून महादेवराव महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा करीत सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील राजकारणाला उकळी दिली आहे. सारी फौज भाजपमध्ये पाठवून स्वतः मात्र सर्व पक्षांच्या वर राहणारे महादेवराव यांनी सम्राट यांच्या उमेदवारीची घोषणा करीत भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या सर्वच प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान दिले आहे.   

दहीहंडीच्या निमित्ताने गेले तीन वर्षे सम्राट महाडिक शिराळा विधानसभा मतदारसंघात जोर-बैठका मारत आहेत. महाडिकांचे मूळ गाव येलूर. या पंचक्रोशीतील दोन जिल्हा परिषद मतदारसंघांवर त्यांनी आपले वर्चस्व नेहमीच सिद्ध केले आहे.

महादेवरावांचे बंधू नानासाहेब महाडिक यांना सांगली जिल्ह्यातील राजकारणात नेहमीच सर्व पक्षांनी ठरावीक अंतरावर ठेवले आहे. नानासाहेब काँग्रेसचे नेते असले तरी त्यांनी कधी पक्ष म्हणून जिल्ह्यात लक्ष घातलेले नाही. वाळव्याच्या राजकारणातही त्यांची पूर्ण विरोधक अशी स्वतंत्र स्पेस कधीच तयार झाली नाही. कधी जयंतरावांना विरोध, समझोता; तर कधी अंतर्गत समझोता असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. वाळव्याच्या राजकारणात जयंतरावांना असलेल्या अनेक विरोधकातील एक विरोधक अशी त्यांची जागा आहे. त्यांनी आता मुलगा सम्राटसाठी शिराळ्याकडे मोर्चा वळवल्याने जयंतरावांना थोडी उसंत मिळण्याचीही शक्‍यता आहे.

वाळव्यातील ४८ गावांवरच महाडिकांची मुख्य भिस्त असेल. त्यामुळेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा मतदारसंघात निशिकांत पाटलांसह रान उठवले असताना जयंतराव विरोधी आघाडीपासून थोडी फारकत घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच शिराळ्यातून विधानसभेसाठी सम्राट महाडिक 
यांच्या उमेदवारीची घोषणा नीतेश राणे यांनी केली होती.

भाजपने तिकीट दिले तर ठीक; नाहीतर सम्राट स्वाभिमानमधून लढतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. सम्राट स्वाभिमानचे पहिले आमदार असतील, असे जाहीर करून त्यांनी शड्डू ठोकले आहेत. लोकसभा मतदारसंघाचीही नवी राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत. खासदार शेट्टी व जयंत पाटील यांच्यातील वाढत्या जवळीकीला नवे संदर्भ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT