sand thefting in sangli atpadi 
पश्चिम महाराष्ट्र

दिवसभर शांतता, तर रात्री वाळू तस्करी

सदाशिव पुकळे

झरे - आटपाडी पश्‍चिम भागामध्ये दिवसभर शांतता दिसून येते. परंतु रात्री मात्र वाळू तस्करीची क्रांती सुरू असल्याचे दिसते. वाळू वाहनावरची तरुणांची गर्दी त्याचे द्योतक आहे. त्याचबरोबर गुटखा आणि मटका यातही तरुणांनी क्रांती केलेली दिसून येत आहे. अनेक संसार उद्‌ध्वस्त होत आहेत, अशी अनेक उदाहरणे परिसरात दिसत आहेत.

ओढापत्रात वाळू तस्करीच्या नावाखाली मोठाले खड्डे पाडले आहेत. ओढा पत्रात पाणीसाठा जास्त दिवस शिल्लक राहणार नाही कारण  वाळूबरोबर खडकाचा उपसा केला जात आहे. भविष्यात पावसाचे पाणी साचून राहणार नाही. ते वाहून जाईल. पाणी साचून राहणार नसल्याने विहिरींना पुरणार नाही. त्या लवकरच कोरड्या पडणार आहेत. कूपनलिका, विहिरी कोरड्या पडून पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्यांनी बागायती पिके वाढवली आहेत. त्यामुळे पाणी उपसा वाढत आहे. पण पाणी साठा करणारे, मुरवणारे पात्र उघडे पडल तर पाणी साठणार कसे आणि पुरणार कसे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. पिकणारी शेती काढून ठेवावी लागणार आहे. ओढा पात्रातील वाळू उपसा थांबला पाहिजे, तरच वाळूमध्ये पाणी साचून त्याचा फायदा विहिरी, बोअरला होऊन दीर्घकाळ पाणी पुरेल.

कमी वेळेत जादा पैसे मिळवण्याची चटक लागलेले थांबत नाहीत. या चक्रात अडकलेले अनेक तरुण व्यसनाधीन होऊन बरबाद झालेत. ग्रामीण भागामध्ये गरीब घरे बांधतात. घराला वाळू पाहिजे असते. परंतु ती मिळत नाही. मग चोरट्या मार्गाने मिळवलेल्या वाळूची प्रचंड महाग दराने विक्री होत आहे. ग्राहकांची अक्षरशः लूटच केली जात आहे. त्यामुळे घर बांधायचे की नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पोलिसांचा वचक नाही
अवैध धंद्यांना सगळीकडेच ऊत आला आहे. पोलिसांचा वचक राहिला नाही काय, अशी चर्चा होत आहे. पोलिस परिसरांत येतात त्यावेळी तरुण युवक त्यांच्याशी चर्चा करताना दिसतात. पोलिसांबरोबर बस-उठ सुरू आहे. चारचौघांत फिरतानाही तरुण पोलिसांच्या खांद्यावर हात टाकून फिरताना दिसतात.

कुरुंदवाडी हद्दीत ओढ्यालगत विहीर आहे. बाजूला ओढा पात्रांमध्ये खडकापर्यंत वाळू उपसा केल्याने, खडकावर पाणी साचून राहणार नाही. विहीर लवकरच कोरडी पडून पिकांचे नुकसान होईल. दरवर्षीच दुष्काळाला तोंड द्यावे लागते. यंदा पाऊस चांगला झाला होता. परंतु विहिरीला पाझराने येणारे पाणीच ओढ्यात साचत नसल्याने पिके वाळून जाण्याचा धोका आहे.
-जोतिराम वगरे, कुरुंदवाडी

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT