Accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

उमदी : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

एक गंभीर; चार चाकी वाहनाचा टायर फुटून अपघात

सकाळ वृत्तसेवा

उमदी : उमदी येथे चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया देवाच्या यात्रेसाठी चालत जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांतील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, पंढरपूरहून येणारी चारचाकी वाहन खूप वेगाने होते. त्याचा टायर फुटला. त्यामुळे ड्राइव्हरचा गाडी वरचा ताबा सुटला त्यावेळी समोर दुचाकी होती. त्याला त्याने जोरात उडवले व नंतर समोरून चालत येणाऱ्या भाविकांचा अंगावरती गाडी गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे (वय ३२ रा. मदभावी, ता. लिंगसूर. जि. रायचुर). नागप्‍पा सोमांना अचनाळ (वय ३४, रा. देवरसुर, ता. लिंगसूर), म्हणप्पा दुर्गप्पा गोंदिकल (वय ४०, रा. देवरसूर) असे मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत.

हुलजंती येथील दीपावलीच्या निमित्ताने महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोक मोठ्याप्रमाणात येत असतात . याच यात्रेसाठी रायचूर येथून भाविक पायी चालत निघाले होते. पंढरपूर ते विजयपूर मार्गावरील उमदीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेवाळे वस्तीजवळ चाकी वाहनाने (एमएच १२, ८५९८) या गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार तात्काळ भेट देऊन जखमींना रुग्णालयात पोचविले. मृतदेह जत येथे शवविच्छेदन करण्यास पाठवून दिले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद चालू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT