नद्यांतील गाळ उपशाचा प्रश्न कायम sakal
पश्चिम महाराष्ट्र

संगमेश्वर : नद्यांतील गाळ उपशाचा प्रश्न कायम

पाच वर्षांपूर्वी नदीतून काढला होता गाळ

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर: एकीकडे चिपळूणची वाशिष्ठी नदी गाळमुक्त होत असताना येथील शास्त्री व सोनवी नदीतील गाळ उपसा यावर्षीही रखडला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही संगमेश्वरला पुराचा धोका कायम आहे.संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाच्या नद्या म्हणून शास्त्री व सोनवी नद्यांचा उल्लेख केला जातो. या नद्यांतून पूर्वीच्या काळात जलवाहतूक सुरू होती. जलवाहतुकीमुळे बंदरे विकसित झाली होती, तसेच संगमेश्वर बाजारपेठेसह माखजन, फुणगूस बाजारपेठेत मालवाहतूक होत होती; मात्र कालांतराने गाळ साचल्याने या नद्यांतील जलवाहतूक बंद झाली. शास्त्री व सोनवी नदीत साचणाऱ्या गाळामुळे संगमेश्वर बाजारपेठेला दरवर्षी पुराचा मोठा धोका निर्माण होतो.

पाच वर्षांपूर्वी रामपेठ ते मापारी मोहल्ला येथील गाळ उपसा करण्यास सुरवात करण्यात आली होती. नद्यांतील गाळ उपसा करून तो रामपेठ येथील रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला होता. तसेच त्याचे सपाटीकरण करण्यात आले होते; मात्र पुढील उपसा थांबल्याने हाच गाळ पुन्हा नदीपात्रात जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

अपेक्षा यावर्षीही अपूर्ण

गतवर्षीच्या पावसाळ्यात संगमेश्वर बाजारपेठेला तीनवेळा पुराने धक्का दिला होता. जवळपास ४ दिवस बाजारपेठेत पाणी होते. यानंतर तरी गाळ उपसा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र यावर्षीही ती पूर्ण झालेली नाही.

सोनवी आणि शास्त्री नद्यांमधील गाळ उपसा व्हावा, यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. हे काम नक्की होईल आणि संगमेश्वरला पूरमुक्ती मिळेल.

- संजय कदम, शाखाप्रमुख, शिवसेना, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuvraj Singh : तू आणखी ३ ते ६ महिने जगू शकतोस... युवराज सिंगला डॉक्टरांनी सांगितले; माजी खेळाडू म्हणाला, मेलो तरी चालेल, पण...

Crime: पतीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर प्रियकरानंही सोडलं; निराशेतून १९ वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये आरक्षण बचाव समितीचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

Post Office Scheme: 300 रुपयांची बचत 15 लाखांचा फंड! व्याजतूनच मिळतील तब्बल 4.40 लाख; पोस्ट ऑफिस योजनेचा जबरदस्त फायदा

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर महिलेचा खून; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय

SCROLL FOR NEXT