घराचे स्वप्न महागले sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : आठ महिन्यांत बांधकाम खर्चात ३२ टक्के वाढ

घराचे स्वप्न महागले

जयसिंग कुंभार

सांगली : गेल्या काही महिन्यांत सिमेंट, स्टील, वीट, क्रश सॅंड-खडी, रंग, प्लंबिंग, खिडकी ग्रील अशा सर्वच बांधकाम साहित्याच्या दरात घसघशीत वाढ झाल्याने बांधकामांचा प्रति चौरस फूट खर्च वाढणार आहे. प्रामुख्याने इंधन दरवाढ हे कारण असले तरी अन्य अनेक कारणांमुळे हा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधिकाधिक महाग होत आहे. बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रेडाईने याबाबत व्यावसायिकांना जागृत केले असून, सरासरी बांधकाम खर्चात गेल्या सहा ते आठ महिन्यांत ३२ टक्के इतकी दरवाढ झाल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे सध्याचा प्रति चौरस फूट बांधकाम खर्च १५८४ रुपयांहून अधिक होत आहे.

आधी नोटाबंदी, त्यानंतर दोन वर्षांनी सांगलीला बसलेला महापुराचा तडाखा आणि सलग दोन वर्षे कोरोनाचा दणका यामुळे बांधकाम क्षेत्र पुरते डबघाईला आले आहे. गतवर्षी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत देऊन केवळ तीन टक्के शुल्क आकारणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते; मात्र त्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आले. तरीही नव्याने सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांची संख्या मोठी आहे. स्पर्धा आणि बांधकाम साहित्यातील दरवाढ अशी दुहेरी कोंडी आहे. इंधनाच्याही दरवाढीमुळे बांधकाम साहित्याच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे.

परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे; मात्र त्यासाठी दर स्थिर राहतील यासाठी शासन कोणतेही प्रयत्न करीत नाही. साहित्याच्या दरवाढीमुळे भविष्यात बांधकामाचे दर तीस टक्क्यांनी वाढणार आहेत. रेरा कायद्यातील तरतुदींमुळे ही दरवाढ ग्राहकांकडून घेता येत नाही. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत.

- दीपक सूर्यवंशी, क्रेडाई, राज्य कार्यकारिणी सदस्य

इंधन दरवाढ महागाईला निमंत्रण देत आहे. नव्या प्रकल्पांचे अर्थकारण चुकत आहे. महागाई रोखण्यासाठी शासनाने पाऊले उचलली पाहिजेत.

- रवींद्र खिलारे, अध्यक्ष, क्रेडाई सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT