mahavitran.jpg
mahavitran.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सर्व पक्षीय कृती समितीतर्फे वीजबिला विरोधात सांगलीत सोमवारी आंदोलन 

विष्णू मोहिते

सांगली,  अन्यायी वीज दर वाढीच्या विरोधात राज्यभर सर्वपक्षीय कृती समितीतर्फे सोमवारी ( ता. 13) राज्यभर महावितरण कार्यालयाच्या समोर 300 युनिटच्या आतील वीज बील माफ करावे यासाठी महावितरणच्या सांगली शहर कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. याच समितीतर्फे ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्‍यांच्या ठिकाणी वाढीव वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. 

सतिश साखळकर म्हणाले, कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्व सामान्य माणसाला जगणे मुश्‍किल झाले आहे अशा परिस्थिस्थित जगायचे की लाईट बिल भरायचे हा प्रश्न सर्व सामान्य माणसासमोर आहे त्यातच वीज नियामक आयोगाने सहा ते तेरा टक्के वीज दरवाढ लागू केली आहे. ही दरवाढ कोरोना काळात झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांची घरे, दुकाने बंद होती त्या काळात एक युनिट ही वीज वापर नसताना सरासरीने बिले पाठवली आहेत. त्यामुळे 300 युनिटपर्यंतची बीलमाफीसाठी आम्ही अर्ज भरुन घेणार आहोत.' 

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले की, चुकीची वीज बिले दुरुस्त करून द्यावीत, दुरुस्त केलेल्या बिलात 50 टक्के वीज बिल माफ करावे, अन्यायी वीज दर वाढ रद्द करावी आदी मागण्यासाठी सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, पलूस, कडेगाव, शिराळा, इस्लामपूर या तालुक्‍याच्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात येणार आहे. आंदोलनात शेकाप, जनता दल, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 
......... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT