sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदत अडकली आयुक्त कार्यालयात

पुणे विभागाला १५० कोटी मिळाले; सांगलीला होतोय विलंब

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला. यामध्ये शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. १ लाख ५६५ शेतकऱ्याचे ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले. शेतीचे ५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सव्वा दोन महिन्यानंतर सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५५० कोटी वर्ग केले. त्यात पुणे विभागासाठी १५० कोटीची मदत आहे. सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रक्कम वर्ग केली आहे. मदत मिळण्याबाबत विलंब होतो आहे. शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले.

जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि कोयना व चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी आणि भुईमूग पिकांना फटका बसला होता. उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर संपूर्ण ऊस पाण्यात बुडाल्याने तो वाया गेला. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली होती.

मिरज तालुक्यातील २६ गावातील २२,७०३ शेतकऱ्याचे १२,६७२ हेक्टर, वाळव्यातील ९८ गावातील ४३ हजार शेतकऱ्याचे १४ हजार ३१३ हेक्टरचे, शिराळ्यातील ९५ गावातील २१ हजार २४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ७५८ हेक्टरचे, पलूसमधील २६ गावातील १३ हजार ५४१ शेतकऱ्यांचे ७ हजार ९१८ हेक्टरचे, तासगावातील २ गावातील ७३ जणांचे ३१.९२ हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झालेत. महापूरामुळे १ लाख ५६५ शेतकऱ्यांचे ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतीचे ५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी संघटनांनीही पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वारंवार आंदोलन केली मात्र मदत मिळाली नाही. सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. त्यामुळे ही रक्कम तिन्ही जिल्ह्याला मिळणार आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे, याबाबत अद्याप प्रशासनाकडेही माहिती उपलब्ध झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT